देश

कर्नाटकची निवडणूक राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 

पीटीआय

हैदराबाद : कर्नाटकमध्ये होणारी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढविणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी आज स्पष्ट केले. येत्या 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या दौऱ्यात राहुल गांधी प्रचाराची सुरवात करणार आहेत, असे प्रतिपादन कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी आज येथे केले. 

मेमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ज्या आमदारांना मतदारसंघातून विरोध होत आहे, त्यांचे यंदाच्या निवडणुकीचे तिकीट कापले जाण्याचे सूतोवाच राव यांनी केले.

त्याशिवाय काँग्रेसला पूर्ण बहुमत न मिळाल्यास जनता दल (एस)बरोबर युती करणार काय यावर ते म्हणाले, की आपल्याला पूर्ण बहुमत मिळेल असा विश्‍वास आहे.

त्याचप्रमाणे एच. डी. देवेगौडा यांच्या पक्षाचा कोणताही भरोसा नसल्याचेही ते म्हणाले. 
कर्नाटकच्या प्रचारात राहुल गांधी यांचा प्रचारातील सहभाग हा फार महत्त्वाचा आहे. त्याशिवाय राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खर्गे, जी. परमेश्‍वर आणि डी. के. शिवकुमार हेसुद्धा प्रभावशाली नेते आहेत. त्याच वेळी राहुल गांधी हे युवकांचे नेते आहेत. ते या प्रचारात आघाडीवर असतील, असेही गुंडू राव यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT