Subramanian swammy
Subramanian swammy 
देश

मंत्र्याने लाच म्हणून मागितल्या दोन नायिका...

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः एका मंत्र्याने प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी चक्क दोन अभिनेत्रींची मागणी केली होती. या मंत्र्यावर कोणत्या कायद्याखाली कारवाई करता येईल? याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी संशोधन करत असून, याबाबात काही माहिती असेल तर सुचवा, असे ट्विट स्वामी यांनी केले आहे.

स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "मी सध्या लाचलुचपत प्रतिबंध कायद्याचा अभ्यास करत आहे. एखाद्या मंत्र्याने प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींची मागणी केली होती. त्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याअन्वये कारवाई करता येईल? याबाबत मी अभ्यास करत आहे. तुमच्याकडे काही सूचना असतील तर कळवा. मी संशोधन करत असलेल्या सध्याच्या एका घोटाळ्याच्या प्रकरणात ते उपयोगी पडेल."

प्रकल्पाला मान्यता हवी असेल तर दोन बॉलिवूडमधील अभिनेत्री पुरवा, अशी या मंत्र्याची मागणी आहे. परंतु, स्वामींनी या मंत्र्याचे नाव जाहीर केलेले नाही. सुब्रमण्यम स्वामींच्या या ट्वीटने मात्री राजकीय आणि कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ उडाली. शिवाय, बॉलिवूडमध्येही गॉसिपींगला सुरवात झाली आहे. स्वामींच्या या ट्वीटमुळे काहींनी माजी मंत्र्याकडे बोट दाखवले आहे तर काहींनी हा मंत्री सध्याचाच असल्याचे सांगितले. यामुळे अभिनेत्रींची मागणी करणारा मंत्री कोण? यावर चर्चेला उधान आले आहे.

ज्येष्ठ वकील आभा सिंह म्हणाल्या, 'सुब्रमण्यम स्वामींनी जे आरोप लावले आहेत ते खूप धक्कादायक आहेत. या प्रकरणाची सखोल आणि गंभीर दखल घ्यायला हवी. स्वामी याबाबत जेव्हा खटला दाखल करतील तेव्हा त्याची चौकशी करण्यापेक्षा आताच गुन्हा दाखल करुन त्याची योग्य चौकशी व्हायला हवी. हा केवळ आरोप नसून महिलांचा अपमान आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT