कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची सुरक्षा (security) भेदल्याची घटना समोर आली आहे. कोलकाता येथील कालीघाट येथील ममता यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. ही घटना शनिवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्यक्ती भिंतीवरून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसला होता.
हा व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या (Mamata Banerjee) निवासस्थानात रात्रभर राहिला. सकाळी पोलिसांच्या नजरेत आल्यावर त्याला अटक करण्यात आली. या व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा भेदल्याची माहिती मिळताच आयुक्त विनीत गोयल यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
या व्यक्तीने झेड श्रेणीची सुरक्षा कशी भेदली याचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिकारी तपासात गुंतले आहेत. सोबतच सुरक्षेचा भंग करण्यामागील हेतूबाबतही माहिती गोळा केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात घरात घुसणारी व्यक्ती एकतर चोर असावे किंवा मानसिकदृष्ट्य़ा अस्वस्थ असावा. मात्र, पोलिस वेगवेगळ्या बाजूने तपास करीत आहे.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ दुहेरी हत्याकांड घडले होते. यानंतर येथील सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या घटनेत व्यापारी अशोक शहा यांचा चाकूने वार करून खून करण्यात आला, तर पत्नीला गोळी लागली.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ बसविण्यात आलेले सीसीटीव्ही काम करत नसल्याचे आढळून आले. तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर हे शांतताप्रिय क्षेत्र असल्याचे सांगितले होते. काही बाहेरच्या शक्तींना परिसरात अशांतता निर्माण करायची आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.