Mizoram Hnahthial Debris Collapsed esakal
देश

Mizoram मध्ये खाण कोसळून दुर्घटना, 12 जणांचे मृतदेह काढले बाहेर; BSF-NDRF चं बचावकार्य सुरू

मौद्रह गावात अपघातस्थळावरून आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मौद्रह गावात अपघातस्थळावरून आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मिझोरामच्या (Mizoram) हनहथियाल जिल्ह्यातील मौद्रह गावात अपघातस्थळावरून आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. हनहथियालचे अतिरिक्त उपायुक्त साजिकपुई यांनी ही माहिती दिलीय.

उपायुक्त यांनी सांगितलं की, 'मौद्रह गावातील दगडखाणीच्या ढिगाऱ्यातून शोध आणि बचाव पथकांनी आणखी तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. यासह आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे.'

याआधी उपायुक्त आर लालरेमसांगा यांनी सांगितलं की, खाण कोसळण्याच्या घटनेत 12 जण बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत त्यापैकी आठ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी शोधमोहीम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. मंगळवारी सकाळी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचं (NDRF) एक पथक तिथं पोहोचलं. यात दोन अधिकारी आणि 13 जवानांचा समावेश आहे.

लालरेमसांगा यांच्या म्हणण्यानुसार, अपघातात बेपत्ता झालेल्या 12 पैकी चार एबीसीआय इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​कर्मचारी होते, तर इतर आठ जण एका कंत्राटदारासोबत काम करत होते. घटनास्थळी आसाम रायफल्स आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी स्थानिक पोलिस आणि लोकांना मदतकार्यात मदत केली.

पश्चिम बंगालमधील 4 मजूर

मिझोराम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 8 मजुरांपैकी 4 मजूर पश्चिम बंगालचे आहेत. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 25 वर्षीय मदन दास, 21 वर्षीय राकेश विश्वास, 22 वर्षीय मिंटू मंडल आणि 25 वर्षीय बुद्धदेव मंडल अशी मृतांची नावं आहेत. सोमवारी दुपारी 3 वाजता ही घटना घडलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT