देश

सोनिया आणि सपना दोघीही डान्सरच; भाजप आमदाराची मुक्ताफळे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली :  डान्सर सपना चौधरीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता त्यांच्या या प्रवेशावरून आमदार सुरेंद्र सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, राजीव गांधी यांनी इटलीची डान्सर सोनिया गांधींना आपलेसे केले. आता राहुल गांधींनीही सपना चौधरीला आपलेसे करावे.

सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशातील रोहानिया विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. सपना चौधरीच्या काँग्रेसप्रवेशावरून त्यांनी राहुल गांधी यांना उद्देशून वक्तव्य केले. ते म्हणाले, तुमची आई (सोनिया गांधी) यापूर्वी इटलीमध्ये अशाच व्यवसायात होती. त्यावेळी तुमच्या वडिलांनी (राजीव गांधी) सोनिया गांधी यांना आपले बनविले होते. आता तुम्हीही सपना चौधरीला आपलेसे करा. त्यामुळे यातील सर्वांत महत्त्वाची बाब हीच, की सासू आणि सूनही एकाच संस्कृतीमधील असतील, असे वक्तव्य केले.

तसेच ते पुढे म्हणाले, राहुल गांधी काँग्रेसच्या परंपेरला पुढे करत आहेत. ही चागंली बाब आहे. आता त्यांनी 'सपनाला अपना' बनवले. असेच राजकारण करा. मात्र, भारतातील जनत डान्सरला कधीही देश चालवण्याचा परवानगी देणार नाही. सपना चौधरी यांच्या काँग्रेस प्रवेशाने राजकारणात काहीही फरक पडणार नाही. 

दरम्यान, सपना चौधरी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्याविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT