rahul gandhi hug narendra modi
rahul gandhi hug narendra modi 
देश

मोदीजी 'बार' जाते हैं..! राहुल गांधी गडबडले..!!

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी 'बाहर' जाते है या ऐवजी 'बार' जाते है असा शब्द उच्चारल्याने सभागृहात आज (शुक्रवार) एकच हशा पिकला. राहुल गांधी यांच्या या शब्दावर पंतप्रधान मोदी यांनाही हसू आवरले नाही.

केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला गेला. त्यानंतर लोकसभेत खासदारांची चर्चा सुरू झाली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांची गडबड झाली. मोदीजी 'बाहर' जाते हैं ऐवजी राहुल गांधी यांनी मोदीजी 'बार' जाते है असे म्हणाले अन् सभागृहात एकच हशा पिकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हसू आवरले नाही. राहुल गांधी यांनी तातडीने आपले बोलणे सावरले, त्यानंतर त्यांनी 'मोदीजी बाहर जाते हैं मगर उससे देशको फायदा नहीं होता' असे म्हणत त्यांच्या विदेश दौऱ्यांवर टीका केली.

दरम्यान, भाजपच्या खासदारांकडूनच खूप चांगले बोलल्याबद्दल माझे अभिनंदन करण्यात आले. भाजप, संघ आणि मोदींनी मला हिंदुस्तानी असल्याचा अर्थ समजावला, असेही गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी आपले भाषण संपल्यानंतर जागेवरुन उठून मोदींकडे जाऊन त्यांची गळाभेट घेतली व पायाही पडले. गांधी आपल्या जागेवर जात असताना मोदींनी गांधी यांना परत बोलावून हस्तांदोलन केले. राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीचे छायाचित्र सोशल मीडियवर व्हॉयरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रिया नोंदविताना दिसत आहे. ट्विटरवर #RahulHugsModi हा टॉप टेनमध्ये ट्रेण्ड आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT