More stringent training to CRPF
More stringent training to CRPF 
देश

'सीआरपीएफ' करणार अधिक कठोर प्रशिक्षण

पीटीआय

नवी दिल्ली : नव्याने भरती झालेल्या जवानांना प्रशिक्षणादरम्यान गंभीर जखमा होत असल्याचे पाहून केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) त्यांनी शारीरिक प्रशिक्षणाच्या जुन्या पद्धतीची फेररचना करण्याचा निर्णय घेतला आहे. नक्षलवाद आणि दहशतवाद यांचा सामना करण्यासाठी या रचनेमध्ये अधिक कणखर आणि चपळ जवान निर्माण करण्यासाठी बदल केले जाणार आहेत. 

"सीआरपीएफ'चे महासंचालक आर. आर. भटनागर यांनी याबाबत "पीटीआय'ला माहिती दिली. "सीआरपीएफ'मध्ये एकूण तीन लाख जवान असून, विविध पदांसाठी दरवर्षी हजारो युवक प्रशिक्षण घेत असतात. "सीआरपीएफ', सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि भारत-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) या दलांमध्ये मिळून 54,953 जागांसाठी भरती करण्याची घोषणा सरकारने काही महिन्यांपूर्वी केली असून, यापैकी 21,566 जण "सीआरपीएफ' भरती केले जाणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रशिक्षणामध्ये बदल करण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

भरती प्रशिक्षणादरम्यान जखमी होणाऱ्या जवानांची संख्या बऱ्यापैकी असल्याने आणि काही वेळा या जखमांचा दीर्घकालीन परिणाम होत असल्याने जुन्या पद्धतीचे शारीरिक प्रशिक्षण बदलण्याचा निर्णय घेतल्याचे भटनागर यांनी सांगितले. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान जवानांनाही आत्मविश्‍वास वाटावा, ते अधिक कणखर आणि चपळ व्हावेत, असा बदल केला जाणार असल्याचेही भटनागर म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT