mumbai 26/11 attacks used google maps and images says plea in delhi high court
mumbai 26/11 attacks used google maps and images says plea in delhi high court  
देश

'26/11च्या हल्ल्यासाठी गुगल मॅप्सचा वापर'

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी गुगल मॅप्सच्या सहाय्याने शहराची रेकी केली होती. गुगल मॅप्समुळे भारताची एकात्मता धोक्यात आली आहे. गुगल मॅप्स विरोधात किसालया शुक्ला या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

शुक्ला यांनी याचिकेमध्ये म्हटले आहे की, 'मुंबईवर 26/11रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आले होते. चौकशीदरम्यान, हल्ल्यांसंदर्भातील अभ्यास करण्यासाठी आणि हल्ल्याची ठिकाणी निवडण्यासाठी गुगलचा वापर केल्याची कबुली दिली होती. भारतातील अतीसंवेदनशील परिसराची माहिती गुगल मॅप्स आणि गुगल अर्थसारख्या माध्यमांवर उपलब्ध असल्याने गुगल मॅप्ससारख्या तंत्रज्ञानाचा भारताच्या एकात्मतेचा धोका आहे. इंटरनेटवरील नकाशे आणि गुगल अर्थवरील सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून देशातील प्रत्येक भागाची माहिती काढता येते. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सामन्यांना काही ठराविक परिसरांमध्ये बंदी घालण्याचा काहीच उपयोग नाही. भारताचा नकाशा देशाबाहेरील कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला देण्याचा अधिकार केवळ भारत सरकारकडे आहे. सध्या खाजगी कंपनीच्या सेवांवर अवलंबून असणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी सरकारनेच नवीन नॅव्हीगेशन सिस्टीम तयार करावी.'

गुगलला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर भारताचा नकाशा अपलोड करण्यापासून थांबवा येण्यासंदर्भातील शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायलयातील मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्यायमुर्ती सी. हरी शंकर यांच्या खंडपीठाने दिले आहेत शुक्ला यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर न्यायालयाने गुगलला भारताचे नकाशे वापरण्यापासून थांबवता येऊ शकते का यासंदर्भात सरकारने लक्ष्य घालावे, असे निर्देश दिले आहेत. शिवाय, सरकारने गुगलला भारतीय कायद्यांनुसार नकाशे वापरण्यासंदर्भात सुचना करायला हव्यात, अशा सुचनाही न्यायलयाने सरकारला केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT