Tejashwi Yadav
Tejashwi Yadav 
देश

Tejashwi Yadav : नितीश कुमारांची मोठी घोषणा! 2025ची निवडणूक तेजस्वींच्या नेतृत्वात लढवणार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - २०२५ मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नसतील. पटनामध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीत त्यांनी स्वत: तशी घोषणा केली आहे. तसेच "2025 च्या विधानसभा निवडणुका तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करणे हे आपलं ध्येय असल्याचं सांगत नितीश यांनी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानपदाचा उमेदवार व्हायचे नसल्याचं स्पष्ट केलं. (Tejashwi Yadav news in Marathi)

अर्थमंत्री आणि जदयूचे ज्येष्ठ नेते विजय चौधरी म्हणाले, "बिहार विधानसभेनंतर महाआघाडी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री नितीश यांनी म्हटलं माझ्यानंतर जे नेतृत्व असेल ते तेजस्वी यादव यांचं असेल. 2025 ची विधानसभा निवडणूक तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे.

तत्पूर्वी, सोमवारी नालंदा येथील डेंटल कॉलेजच्या उद्घाटनप्रसंगी नितीशकुमार म्हणाले की, बिहारमध्ये आम्ही अनेक दिवसांपासून विकासकामे करत आहोत. जी कामे करायची होती, ती सर्व केली. आता हे कामं तेजस्वी यांना पुढे न्यायचे आहेत. आता तेजस्वी यांच्याकडूनच एक-एक काम करून घ्यायचं आहे. त्यामुळे आता तेच सर्व काही पाहत आहेत, समजून घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT