narendra modi
narendra modi 
देश

नेटिझन्सनी भाजपला दिला 'त्या' 15 लाखांमधून निधी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या ट्‌विटर हॅंडलद्वारे, "नरेंद्र मोदी म्हणजेच "नमो ऍप'च्या माध्यमातून पक्षासाठी शक्‍य तेवढे दान करावे,' असे आवाहन केले आहे. "शक्‍य तेवढे' याच्या व्याख्येचा परीघ भाजपने पन्नास रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत ठेवला आहे. मात्र, नेटिझन्सनी आमच्या खात्यात जे 15 लाख देणार होतात त्यामधून पैसे कापून घ्या आणि बाकीचे पैसे आमच्या खात्यावर टाका अशी उलट मागणी मोदींकडे केली आहे.

नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये निवडणुकाच्या वेळी प्रचारादम्यान दिलेल्या आश्वासनाची नेटिझन्सनी आठवण करुन दिली. परदेशातील काळा पैसा परत आणू, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात किमान 15 लाख रुपये देऊ, असे भाजपने प्रचारादरम्यान सांगितले होते. त्यामुळेच भाजपला देणगी देण्याऐवजी भाजपानेच त्या 15 लाखांमधील पैसे देणगी म्हणून कापून घेत उरलेले पैसे त्वरीत आमच्या खात्यावर जमा करावेत, असे उत्तर मोदींना ट्विटद्वारे केले आहे.

दरम्यान, तब्बल 11 कोटी सदस्य संख्येसह संपूर्ण जगातील सर्वांत मोठा पक्ष, भारताच्या सरकारसह तब्बल 19 राज्यांत सत्ता, असे वर्णन केले जात असलेल्या एका महाशक्तिशाली पक्षाला पक्षनिधीसाठी अगदी छोटी म्हणजे प्रत्येकी एक हजार रुपये फक्त, इतकी आर्थिक मदत करण्याचे आवाहन साक्षात या पक्षाच्या अध्यक्षांनी केले, हे कुणाला खरेही वाटणार नाही. पण ती सत्यस्थिती आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या ट्‌विटर हॅंडलद्वारे, "नरेंद्र मोदी म्हणजेच "नमो ऍप'च्या माध्यमातून पक्षासाठी शक्‍य तेवढे दान करावे,' असे आवाहन केले आहे. "शक्‍य तेवढे' याच्या व्याख्येचा परीघ भाजपने पन्नास रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत ठेवला आहे.

सनातन हिंदू संस्कृती सांगते, की दान असे करावे की एका हाताने दिले तर दुसऱ्या हातालाही कळू नये. पण सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांनी मात्र हजारा-हजारांच्या देणगीचीही जाहीर वाच्यता करण्याचा सपाटा लावल्याचे चित्र दिसते. मुळात, पक्षकार्यकर्ते व जनतेकडून जाहीरपणे देणगी घेण्याच्या केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या तंत्राची भाजपने सहीसही नक्कल केल्याचे दिसत आहे. "नमो ऍप'च्या माध्यमातून फक्त पंतप्रधानांचे संबोधन व संवाद होतो व विकासकामांची माहिती सव्वाशे कोटी भारतीयांपर्यंत पोचविली जाते, असे सांगणाऱ्या भाजपने याच माध्यमातून हळूच झोळी पसरली आहे.

भाजपच्या या ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, (तुमचे) एक छोटेसे दान, एक भारत श्रेष्ठ भारत साकार करण्यासाठी मोठे पाऊल असल्याचे सिद्ध होईल. "नमो ऍप'च्या माध्यमातून असे छोटे दान करून पक्षाला मदत करावी. पक्षाच्या या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पक्षासाठी 1 हजार रुपयांची देणगी दिली व सामाजिक जीवनात पारदर्शिता आणण्यासाठी पक्षनिधीच्या या संकल्पनेत सहभाग द्यावा, असे आवाहन पक्षकार्यकर्त्यांना केले आहे. पाठोपाठ अमित शहा व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही एक हजाराची देणगी दिल्याचे जगजाहीर करून "आपल्या' कार्यकर्त्यांनाही आपण तसेच आवाहन केल्याचे सांगितले. शहा यांनी सांगितले की, मी "नमो ऍप'च्या माध्यमातून पक्षासाठी एक हजार रुपयांचे दान दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : कॉँग्रेसने ६० वर्षे देशाला बुडविले ; शिंदे

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT