Narendra Modi, Kili Paul and Nima Paul टिम ई सकाळ
देश

PM मोदी म्हणतात, लिप्सींग करून व्हिडीओ बनवा; प्रसिद्ध भावंडांचे दिले उदाहरण

मोदी यांनी 'एक भारत श्रेष्ठ भारत' या संकल्पनेवर बोलताना भारतीय भाषांना लोकप्रिय करण्याचे आवाहन केले

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नी आज 'मन की बात' मार्फत देशवासीयांशी संवाद साधला. 'एक भारत श्रेष्ठ भारत' या संकल्पनेवर बोलताना त्यांनी भारतीय भाषांना लोकप्रिय करण्याचं आवाहन केलं. या संदर्भात त्यांनी किली आणि नीमा या प्रसिद्ध भावंडांचं उदाहरण दिलं. हे भाऊ-बहीण बॉलीवूडच्या गाण्यांवर थिरकत असतात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. (Narendra Modi urge to make lip-syncing videos of popular songs)

नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये या भावंडांचं उदाहरण देत, 'किली आणि नीमा या भावंडांप्रमाणेच मी प्रत्येकाला, विशेषत: वेगवेगळ्या राज्यांतील मुलांना लोकप्रिय गाण्यांचे लिप-सिंकिंग (Lip-syncing) व्हिडिओ बनवण्याचे आवाहन करतो, असं म्हटलं. 'एक भारत श्रेष्ठ भारत' संकल्पनेतून भारतीय भाषांना लोकप्रिय करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

बॉलिवूडच्या सूपरहिट गाण्यांवर लिंप सिंक करणारे टांझानियाचे (Tanzania) किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल लोकप्रिय आहे. भारतात तर त्यांचे खूप फॅन्स आहेत. किली पॉलला लहानपणापासूनच बॉलीवूडची गाणी आवडतात. हिंदी गाण्यांची आवड असल्याने किलीच्या ओठात सतत ती गाणी असतात. ते दोघेही यावर यावर रील्स बनवतात. यामुळे सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT