Crime Sakal
देश

सायकल पुसण्यासाठी तिरंग्याचा वापर; ४२ वर्षीय व्यक्तीला कोठडी

सोशल मिडीयावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

डेहराडून : उत्तराखंडमधील हलदाणी येथे एका सायकलच्या दुकानात एक व्यक्ती तिरंग्याचा वापर करत सायकल पुसत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी सदर ४२ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सदर व्हिडीओमध्ये सायकल पुसणाऱ्या व्यक्तीच्या हातात असलेला तिरंगा स्पष्टपणे दिसत आहे.

दरम्यान सोशल मिडीयावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये आपल्याला एक सायकलचं दुकान दिसत आहे. त्यामध्ये एक व्यक्ती एक एक करत सायकल पुसताना दिसत आहे. नंतर त्याच्या हातातून तिरंगा खाली पडतो. तो परत त्याला उचलून घेत असताना तो स्पष्टपणे आपल्याला दिसतो.

हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून याप्रकरणी सर्व स्तरातून व्यक्त निषेध केला जात आहे. यानंतर पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याबरोबर त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान याअगोदर आसाममध्ये याप्रकारे भारतीय तिरंग्याचा अवमान केल्याची घटना घडली होती. एका घरातील डायनिंग टेबल पुसण्यासाठी तिरंग्याचा वापर केल्याची घटना घडली होती. यासंदर्भात एक फोटो व्हायरल झाला होता. सदर कुटुंबातील व्यक्ती या टेबलवर तिरंगा ठेऊन त्यावर जेवन करतानाचा हा फोटो होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT