Army
Army 
देश

पाकच्या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह 4 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था

जम्मू : पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरूच असून, पाकिस्तानी रेंजर्सकडून आज पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील भीमबर गली सेक्‍टरमध्ये आज सायंकाळी (जि. राजौरी) पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह चार जवान हुतात्मा आणि तीन जण जखमी झाले. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या लष्करी अधिकाऱ्याला दवाखान्यात नेत असताना निधन झाल्याचे लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले. यादरम्यान भारताकडूनही या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले गेले. पाकिस्तानच्या कारवायांमुळे सीमेवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

तत्पूर्वी आज सकाळी पूँच जिल्ह्यात प्रत्यक्ष ताबा रेषेलगतच्या भागात लष्कराच्या आघाडीच्या चौकीवर पाकिस्तानने गोळीबार केला. दिवसभर अधूनमधून गोळीबार सुरूच होता. सायंकाळी भीमबर गली सेक्‍टर आणि मंजाकोट सेक्‍टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार वाढला. भारतानेही या गोळीबाराला चोख उत्तर दिले; पण यात तीन जवान हुतात्मा आणि दोन जण जखमी झाले. जखमी झालेल्या अधिकाऱ्यास दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. हुतात्मा जवानांची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही.

भीमबर गली सेक्‍टरवर पाकिस्ताननकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून, पूँच जिल्ह्यात शाहपूर सेक्‍टरमध्येदेखील आज सकाळी 11 च्या सुमारास गोळीबार झाला. या ठिकाणी उखळी तोफांचा मारा करण्यात आला. हा मारा 182 आणि 120 मिमीच्या उखळी तोफांबरोबरच स्वयंचलित मशिनगनने केल्याचे प्रवक्‍त्याने सांगितले. शाहपूरच्या गोळीबारात दोन मुलांसह एक जवान जखमी झाला. शहानाज बानो (वय 15) आणि यासिन अरिफ (वय 14) अशी जखमी मुलांची नावे आहेत. दोघांवरही दवाखान्यात उपचार सुरू आहेत. भारताने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या अनेक चौक्‍यांचे नुकसान झाल्याचे लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले. 

जानेवारीत 8 नागरिकांचा मृत्यू 
पाकिस्तानच्या गोळीबारात जानेवारी महिन्यात 8 नागरिक मृत्युमुखी पडले, तर 6 जवान हुतात्मा झाले. तसेच 65 हून अधिक जखमी झाले आहेत. जम्मू भागात शस्त्रसंधी उल्लंघन केल्याच्या अधिक घटना घडल्या आहेत. जम्मू, कथुआ आणि सांबा तसेच प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील पूँच आणि राजौरी जिल्ह्यात 18 ते 22 जानेवारीदरम्यान पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार झाला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर 22 जानेवारीनंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नसताना प्रत्यक्ष ताबा रेषेलगतच्या भागात मात्र अधूनमधून तोफगोळ्याचा मारा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SCROLL FOR NEXT