Rahul Gandhi
Rahul Gandhi 
देश

'जादूगार' मोदी लोकशाहीदेखील गायब करतील: राहुल गांधी 

वृत्तसंस्था

शिलॉंग : "पंतप्रधान नरेंद्र मोदी "मोठे जादूगार' आहेत, ते अगदी लोकशाहीसुद्धा गायब करून दाखवतील,'' अशा शब्दांत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज टीका केली. 

बॅंकांची फसवणूक करून देशातून पळून गेलेले उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदीचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, "मोठे जादूगार असल्याची पंतप्रधानांची प्रतिमा आहे. ते सहजपणे कोणतीही गोष्ट गायब करू शकतात. विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी जादू घडावी तसे परदेशात पळून गेले. कायद्याच्या कक्षेच्या बाहेर निघून गेले. पंतप्रधानांची जादू लवकरच देशातील लोकशाहीदेखील गायब करू शकेल.'' 

जोवाई येथे निवडणूक प्रचार सभेत गांधी बोलत होते. ते म्हणाले, "केंद्रातील सरकार भ्रष्टाचार निपटून काढू शकत तर नाहीच; पण ते भ्रष्टाचारात सहभागी होत आहे. देशात रोजगार निर्माण करण्यात, शेतकऱ्यांच्या धान्याला चांगला भाव देण्यात सरकारला अपयश आले आहे. चार वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. प्रत्येकाला पंधरा लाख रुपये, दोन कोटी नवे रोजगार असे आश्‍वासन दिले. आता सरकारचा कार्यकाळ संपत असताना केवळ आर्थिक विकासाऐवजी निराशा, बेरोजगारी, भीती, द्वेष, हिंसाचाराचे वातावरण आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT