Rahul Gandhi
Rahul Gandhi 
देश

काँग्रेसमध्ये 'राहुल'पर्व; अध्यक्षपदाची सूत्रे हाती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये दोन दशकांपासून सुरू असलेले सोनिया युग आज (शनिवार) समाप्त झाले असून, आजपासून राहुलपर्वाला सुरवात झाली. राहुल गांधी हे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. अध्यक्षपदासाठी केवळ राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता. 

काँग्रेस मुख्यालयात आज सकाळी झालेल्या सोहळ्यामध्ये राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. या कार्यक्रमाला देशभरातून काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून अनेक नागरिक या ठिकाणी पोचले होते. अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आदी काँग्रेस नेते उपस्थित होते. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी काँग्रेस मुख्यालयामध्ये राहुल गांधींना विजयाचे प्रमाणपत्र सोपविले. 

राहुल यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्यासाठी पक्षाचे कार्यकारिणी सदस्य, सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष आदींनी 89 अनुमोदक संच दाखल केले होते. पाच डिसेंबरला झालेल्या अर्ज छाननीतूनच अनौपचारिकरीत्या राहुल यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले होते; परंतु निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता स्पष्ट करण्यासाठी अर्ज माघारीनंतरच राहुल गांधींच्या निवडीची घोषणा होईल, असे कॉंग्रेसतर्फे सांगण्यात येत होते. त्या पार्श्‍वभूमीवर रामचंद्रन यांनी निवडणूक प्राधिकरणातील अन्य सहकारी मधुसूदन मिस्त्री आणि भुवनेश्‍वर कालिता यांच्या उपस्थितीत राहुल गांधींनी अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. गुजरातच्या निवडणूक प्रचारात व्यग्र असलेल्या राहुल गांधी यांनी आज अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. काँग्रेसमध्ये "राहुलराज'च्या प्रारंभाचे मुख्यालयाबाहेर जमलेल्या नेते कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. जोरदार घोषणाबाजीद्वारे, ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्‍यांच्या आतषबाजीत या कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या निवडीचा आनंद व्यक्त केला. 

गुजरात निवडणुकीमधील आक्रमक प्रचारामुळे राहुल गांधींची उंचावलेल्या प्रतिमेचे भांडवल करण्यासाठी हा कार्यक्रम "जोरदार इव्हेन्ट' म्हणून काँग्रेसकडून साजरा करण्यात आला.  2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे सर्वमान्य उमेदवार म्हणून ठसविण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असला तरी मोदींविरोधात समविचारी विरोधी पक्षांची बळकट आघाडी असावी, असाही विचार कॉंग्रेसमधून मांडला जात आहे. सर्वांत नजीकच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचप्रमाणे राजस्थान आणि मध्य प्रदेशात कॉंग्रेसला अन्य पक्षांशी आघाडीची फारशी आवश्‍यकता नाही. छत्तीसगडमध्येही यंदा चांगली संधी असल्याचे कॉंग्रेसचे मानणे आहे. तमिळनाडूत द्रमुक, महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बिहारमध्ये लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाशी कॉंग्रेसची आघाडी आहेच. मात्र, संसदेत सर्वाधिक खासदार पाठविणाऱ्या उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला एकत्र आणण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. आंध्र प्रदेशात वायएसआर कॉंग्रेस, तेलंगणात "टीआरएस', जम्मू-काश्‍मीरमध्ये उमर अब्दुल्लांचा नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांवरही आघाडीसाठी काँग्रेसची नजर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT