Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhu 
देश

नवज्योतसिंग सिद्धूंचा राजीनामा; पंजाब सरकारमधील मतभेद उघड

वृत्तसंस्था

पंजाब : पंजाब सरकारमधील दुफळी चव्हाट्यावर आली असून, नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. याबाबतची माहिती नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्विटरवरुन दिली आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा 10 जूनला दिला होता. मात्र, याबाबत आज खुलासा केला आहे. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू आता पुढे काय निर्णय घेणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मतभेद होते. लोकसभा निवडणुकांनंतर पंजाब राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या पहिल्या बैठकीला हजर न राहता त्याऐवजी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. ऊर्जा खात्याची जबाबदारी असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडील स्थानिक स्वराज्य संस्थांचे खाते काढून घेऊन त्यांना ऊर्जामंत्री करण्यात आले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाबच्या शहरी भागामध्ये काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे असलेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे खाते काढून घेण्याचा विचार पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी बोलून दाखविला होता. त्यामुळे अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील मतभेद विकोपाला गेले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT