Supreme Court
Supreme Court 
देश

नक्षल कनेक्शन : पाच जणांच्या नजरकैदेत वाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या पाच जणांची नजरकैद 12 सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आला.

पाच कार्यकर्त्यांना असहमतीच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे नाही; तर बंदी घातलेल्या भाकप (माओवादी)शी त्यांच्या संपर्कासंबंधीच्या ठोस पुराव्याच्या आधारे अटक करण्यात आली असल्याचा दावा महाराष्ट्र पोलिसांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला होता. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 29 ऑगस्टला या कार्यकर्त्यांना 6 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. आज त्यांच्या नजरकैदेची मुदत संपल्यानंतर यामध्ये आणखी सहा दिवसांची वाढ करण्यात आली. 

महाराष्ट्र पोलिसांनी 28 ऑगस्टला अनेक राज्यांत प्रमुख डाव्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे मारले होते आणि माओवाद्यांशी संपर्कात असलेल्या संशयावरून तेलुगू कवी वरवरा राव, व्हेर्नोन गोन्झाल्विस, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा या पाच कार्यकर्त्यांना अटक केली होती. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या अटकेला जोरदार विरोध दर्शविला होता. गेल्या वर्षी 31 डिसेंबरला पुणे येथे आयोजित एल्गार परिषद कार्यक्रमानंतर कोरेगाव भीमा गावात भडकलेल्या हिंसाचाराचा तपास करताना पोलिसांनी हे छापे टाकले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT