anandiben patel
anandiben patel 
देश

निवडणूक रिंगणातून आनंदीबेन बाहेरच

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज दिल्लीतून जारी केलेल्या सहाव्या आणि अखेरच्या यादीतील 34 नावांमध्येही माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे नाव नसल्याने त्यांना तिकीट दिले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने यंदा नमनालाच पंतप्रधानांच्या सभांचा षटकार मारताना देवेंद्र फडणवीसांसह चार मुख्यमंत्री व किमान डझनभर केंद्रीय मंत्र्यांची फौजच राज्याच्या प्रचारात उतरविली आहे.

भाजपच्या 182 उमेदवारांपैकी अखेरच्या यादीतही पटेलांचे वर्चस्व असून 12 पटेल व दोन ब्राह्मणांना स्थान मिळाले आहे. एकूण उमेदवारांत भाजपने सर्वाधिक 61 ओबीसी व त्याखालोखाल 52 पटेल, 28 मागासवर्गीय, 12 इतर मागासांना तिकिटे दिली आहेत. पंतप्रधान मोदी ओबीसी वर्गात मोडतात. यात आनंदीबेन यांच्या नावाबद्दल उत्सुकता होती. मात्र त्यांना संघाच्या वयाच्या अटीचे कारण दाखवून भाजप नेतृत्वाने तूर्त गप्प केले तरी त्यांच्या समर्थकांनी गोंधळ सुरू केला आहे. आनंदीबेन यांचे निकटवर्ती भूपेंद्र पटेल यांना थेट मोदींनी हस्तक्षेप केल्यावरच घाटलोडियातून तिकीट मिळाल्याचे कळते. काल रात्री हा गोंधळ प्रचंड वाढल्याने पक्षाध्यक्ष अमित शहा यांना निवडणूक कार्यालयात धाव घ्यावी लागली होती. काही आनंदीबेन समर्थक दिल्लीत पोचल्याचे वृत्त असून त्यातील काहीजण लालकृष्ण अडवानी यांच्या घराबाहेर जमले होते अशीही माहिती मिळाली आहे. भाजपने ज्या 14 आमदारांची तिकिटे कापली त्यातील अनेक जण आनंदीबेन यांचे समर्थक मानले जातात. यानंतर पक्षात जोरदार गदारोळ सुरू झाला आहे. जाणकारांच्या मते भाजपच्या जागा लक्षणीयरीत्या कमी झाल्या तरी तो पक्षाचा पराभवच मानला जाईल व भाजप नेतृत्वाने याच गोष्टीची धास्ती घेतल्याचे दिसत आहे.

गुजरातेत केंद्रीय मंत्र्यांची फौज
भाजपने पंतप्रधानांसह तब्बल डझनभर केंद्रीय मंत्र्यांना गुजरातेत उतरविल्याने ही निवडणूक दिल्ली विधानसभा निवडणुकीच्याच अंगाने जात असल्याचे दिसते. याशिवाय वसुंधराराजे (राजस्थान), शिवराजसिंह चौहान (मध्य प्रदेश) व रमणसिंह (छत्तीसगड) या मुख्यमंत्र्यांनाही प्रचारात उतरविले गेले आहे संरक्षण मंत्रालय सोडून निर्मला सीतारामन सध्या अहमदाबादेतच तळ ठोकून बसल्या आहेत. राहुल गांधी यांनी कोणताही आरोप केला की त्याच्या त्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर द्यायचे ही कामगिरी सीतारामन यांच्यावर सोपविली गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT