DRDO Transfer Technology To Private Company
DRDO Transfer Technology To Private Company Sakal
देश

संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान खासगी कंपनीला, DRDO चा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी भारतात अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या DRDO ने T-90 रणगाड्यासाठी नाईट व्हिजन (रात्रीही स्पष्ट दिसणारे) (Night Vision Technology Tank) तंत्रज्ञान कानपूरमधील संरक्षण कंपनी MKU कडे हस्तांतरित केले आहे. DRDO ने हे तंत्रज्ञान हस्तांतरित केलेली ही पहिली खासगी कंपनी आहे. (DRDO Transfer Technology To Private Company )

भारतीय लष्कराकडे सध्या 2000 पेक्षा जास्त T-90 भीष्म रणगाडे, 120 हून अधिक अर्जुन रणगाडे आणि सुमारे 2400 T-72 रणगाडे आहेत. T-90 हा भारतीय लष्कराचा मुख्य लढाऊ रणगाडा आहे. MKU भारतातील T-90 रणगाड्यासाठी चालकासाठी रात्रीची दृश्यमानता तयार करण्यासाठी DRDO सोबत काम करण्यास उत्सुक आहे, असं MKU चे संचालक वैभव गुप्ता यांनी सांगितलं. T-90 तसेच इतर टी-सीरीजच्या रणगाडे, इतर बख्तरबंद वाहनांमध्ये बसू शकेल असे उपकरण विकसित करणे हा यामागचा उद्देश आहे. रात्रीच्या दृश्यमानतेच्या तंत्रज्ञानामुळे सैन्याचा धोका कमी होईल. या तंत्रज्ञानात सुधारणा झाल्यामुळे रणगाड्यात बसणाऱ्या सैनिकाची ताकदही वाढणार आहे.

रणगाड्यांमधील सेन्सर्सच्या कमतरतेमुळे रणगाड्यांचे कमांडर आणि चालकाला रात्रीच्या कारवाया करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. पण, आता भारतीय लष्कराच्या युद्ध रणगाड्यांमध्ये नाईट व्हिजन तंत्रज्ञान विकसित होणार असल्यानं रणगाडे चांगल्या पद्धतीने चालवण्यास तसेच आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यास मदत होईल. तसेच या तंत्रज्ञानामुळे रणगाड्यांची क्षमता देखील वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT