देश

Loksabha 2019: काँग्रसची नववी यादी जाहीर; महाराष्ट्रातील चार उमेदवारांचा समावेश

सकाळन्यूजनेटवर्क

चंद्रपूर- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची आज (रविवार) नववी यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेसने महाराष्ट्रात आणखी चार उमेदवारांची घोषणा केली असून हिंगोलीतून सुभाष वानखेडे, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर, रामटेकमधून किशोर गजभिये तर अकोल्यातून हिदायत पटेल या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

हिंगोलीचे विद्यमान खासदार राजीव सातव आणि मुकुल वासनिक हे निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर चंद्रपूरमध्ये विनायक बंगाडेऐवजी सुरेश धानोरकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा यापूर्वी केली होती. त्यानंतर आज पक्षाने नववी यादी जाहीर केली. यामध्ये चंद्रपूर येथून विनायक बंगाडेऐवजी सुरेश धनोरकर तर हिंगोलीतून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने देशभरातील १० लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. यापूर्वी चंद्रपूर मतदारसंघातून विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु, नव्या यादीत त्यांची उमेदवारी रद्द केली असून त्यांच्याजागी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले सुरेश धानोरकर यांना या मतदारसंघातून उमदेवारी देण्यात आली आहे. धानोरकर हे भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना लढत देतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT