देश

Loksabha 2019: काँग्रेसचे पटनाईक पिता आणि पुत्र ओडिशात सर्वांत श्रीमंत 

वृत्तसंस्था

भुवनेश्‍वरः ओडिशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनाईक आणि त्यांचा मुलगा नवज्योती हे सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी राज्यात 29 एप्रिलला चौथ्या टप्प्याचे शेवटचे मतदान होईल. 

बालासोर लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरलेल्या नवज्योती यांची एकूण संपत्ती 104 कोटी रुपयांची असून, या मतदारसंघातून रिंगणात असलेल्या 52 उमेदवारांमध्ये ते सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि बीजू जनता दलाचे उमेदवार रवींद्रकुमार जेना हे 72 कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

निरंजन हे विधानसभेसाठी उभे असून, 60 कोटी रुपयांच्या संपत्तीसह 334 उमेदवारांमध्ये ते अव्वल आहेत. घासीपुरा आणि भण्डारीपोखरी या दोन मतदारसंघांमधून ते रिंगणात आहेत. ओडिशात निवडणुकीच्या या अखेरच्या टप्प्यात लोकसभेच्या मयूरभंज, बालासोर, भद्रक, जाजपूर, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या मतदारसंघांसाठी मतदान होईल. त्याचबरोबर विधानसभेच्या 42 मतदारसंघांतही मतदान होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT