Nirav Modi company
Nirav Modi company 
देश

नीरव मोदीच्या संपत्तीवर टाच; एकूण 637 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गैरव्यवहार करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या देश-परदेशातील सर्व संपत्तीवर केंद्र सरकारने टाच आणली. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईमध्ये मोदीची एकूण 637 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 

या कारवाईत मोदीचे आलिशान फ्लॅट्‌स, बँक खाती सील केली आहेत. यात भारतासह ब्रिटन आणि अमेरिकेतील मालमत्तेचा समावेश आहे. 

पंजाब नॅशनल बँकेची 13 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मोदीवर आरोप ठेवण्यात आला आहे. गुन्हेगारी स्वरूपातील कारवाईमध्ये परदेशातील मालमत्तेवर कारवाई करण्याची ही भारतातील दुर्मिळ घटना आहे. 

मोदीवर जानेवारीमध्ये सीबीआयने पहिले आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर मोदीने 22.69 कोटी रुपयांचे दागिने हॉंगकॉंगमध्ये पाठविले होते. हे दागिनेही पुन्हा भारतात आणण्यात आले आहेत. हॉंगकॉंगमधील एका खासगी बँकेत मोदीच्या वैयक्तिक खात्यामध्ये हे दागिने जमा करण्यात आल्याचा आरोप झाला होता. सुरवातीला या दागिन्यांची एकूण किंमत 85 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा झाला होता; मात्र स्वतंत्र तपासणीनंतर हे दागिने 22.69 कोटी रुपयांचे असल्याचे स्पष्ट झाले. 

मोदीची बहीण पूर्वी मोदी हिच्या नावे असलेल्या लंडनमधील घरावरही 'ईडी'ने कारवाई केली आहे. या घराची किंमत 57 कोटी रुपये आहे. पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून लाटलेल्या पैशांतून हे घर विकत घेतल्याचा आरोप 'ईडी'ने ठेवला आहे. न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क भागातील दोन प्रशस्त घरांवरही टाच आणण्यात आली आहे. या दोन्ही घरांची किंमत 216 कोटी रुपये आहे. ही घरे नीरव मोदीची पत्नी ऍमी मोदी हिच्या नावे आहेत. 

बँकेची फसवणूक केल्यानंतर ते पैसे अत्यंत हुशारीने दुबई, बहामा, अमेरिका आणि सिंगापूर येथे वळविण्यात आल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले. यामुळे विविध देशांतील न्याय व तपास यंत्रणांशी समन्वय साधण्याचे आव्हान भारतीय तपास यंत्रणांसमोर आहे. 

याशिवाय, दक्षिण मुंबईतील पूर्वी मोदीच्या नावे असलेले 19.5 कोटी रुपयांचे घरही 'ईडी'ने जप्त केले आहे. नीरव मोदी, पूर्वी मोदी आणि त्यांच्या कंपन्यांच्या विविध खात्यांमध्ये मिळून 278 कोटी रुपये होते; ती खातीही सील केली आहेत. या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर वरीलपैकी बहुतांश खात्यांमध्ये पैसे वळविण्यात आल्याचे तपासात आढळून आल्याने ही कारवाई झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT