nitish kumar tejashwi yadav to take same flight amid opposition patna to delhi flight Sakal
देश

नितीशकुमार-तेजस्वी यांचा एकत्र विमान प्रवास

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पाटणा ते दिल्ली असा एकत्र विमानातून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभा निकालात भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांसह केंद्रात सरकार स्थापन करावे लागणार आहे. आतापर्यंत घटक पक्षांवर अवलंबून न राहणाऱ्या भाजपला प्रादेशिक पक्षांच्या सहकार्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.

यादरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पाटणा ते दिल्ली असा एकत्र विमानातून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव हे आज सकाळी एकाच विमानातून दिल्लीला रवाना झाले.

दोन्ही नेते आपापल्या आघाडीच्या म्हणजे नितीशकुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या आणि तेजस्वी यादव हे ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला हजर राहिले. या दोन्ही आघाड्यांच्या निमंत्रकांनी घटक पक्षाच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले होते.

यादरम्यान दोन्ही आघाड्यांनी नितीशकुमार यांच्याशी संपर्क केला आहे. मात्र नितीशकुमार यांनी एनडीएला पाठिंब्याचे पत्र दिल्याचे सूत्राने सांगितले. भाजपला अनेकदा धक्का देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध प्रदेशचे तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या विश्‍वासावर अवलंबून राहावे लागणार आहे.

विमान प्रवासात तेजस्वी यादव हे नितीशकुमार यांच्या मागील सीटवर बसले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य होते. मात्र विमानात प्रवासात उभय नेत्यांत राजकीय चर्चा झाली की का? याबाबत तर्कवितर्क लावले गेले आहेत.

पाटणा विमानतळावरून निघण्यापूर्वी तेजस्वी यादव यांनी आम्ही ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही दिल्लीला जात आहोत, असे सांगितले. पत्रकारांनी नितीशकुमार देखील याच विमानातून दिल्लीला जात असल्याचे सांगितले असता त्यांनी हसून मला माहीत नसल्याचे उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT