देश

आता पेटीएमवरून भरा दंड

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वाहतुकीचे नियम मोडल्याच्या प्रकरणांत आता पेटीएमद्वारेही दंड भरता येईल. त्यासाठी राज्य पोलिसांनी या कंपनीसोबत करार केला आहे. अशा प्रकारे ऑनलाईन दंड स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील सातवे राज्य आहे. 

मुंबईसह राज्यातील अन्य शहरांत वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाचे चलान ऑनलाईन पाठवले जाते. संबंधित व्यक्तीला दंड भरण्यासाठी मात्र वाहतूक पोलिस चौकीत जावे लागते. अशा प्रकरणांत आता घरबसल्या दंड भरता येणार असून, त्यासाठी राज्य पोलिसांनी पेटीएम या कंपनीसोबत करार केला आहे. त्यामुळे पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरणारी दंडवसुली पेटीएम पर्यायामुळे सोपी होणार आहे. 

दंड भरण्यासाठी पेटीएम संकेतस्थळ व ऍपचा वापर करता येईल, असे या कंपनीकडून सांगण्यात आले. या नव्या पद्धतीमुळे वाहतूक पोलिस विभागाला त्यांचे कामकाज अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. त्याचप्रमाणे चलान गोळा करण्याच्या कामातून कर्मचाऱ्यांना मोकळे करता येईल, असे वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विनय कारगावकर यांनी सांगितले. 

महाराष्ट्र सातवे राज्य 

हरियाना, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश या सहा राज्यांत अशा प्रकारे दंड भरता येतो. त्यामुळे वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबद्दल ऑनलाईन दंडवसुलीची सोय करणारे महाराष्ट्र हे सातवे राज्य झाले आहे. राज्यातील अनेक भागांत वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल दंडाचे चलान ऑनलाईन पाठवले जाते. त्यानंतर आता ऑनलाईन दंडवसुली सुरू झाली आहे. 


असा भराल दंड 

- पेटीएमचे संकेतस्थळ आणि मोबाईल ऍपवर "चलान' पर्यायावर क्‍लिक       करा. 
- त्यानंतर महाराष्ट्र वाहतूक पोलिस या पर्यायावर क्‍लिक करा. 
- महाराष्ट्र वाहतूक पोलिस, असे लिहिलेला पहिला बॉक्‍स समोर येईल. 
- त्याखालील बॉक्‍सवर चलान क्रमांक व वाहनाचे शेवटचे चार अंक लिहून दंड  भरा. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT