देश

Cyclone Fani: फणी'च्या बळींची संख्या 29 वर

वृत्तसंस्था

भुवनेश्वर: 'फणी' चक्रीवादळाने ओडिशात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या रविवारी 29 वर पोचली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 'फणी' चक्रीवादळामुळे ओडिशाच्या किनारपट्टीला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या भागातील नागरिकांना आता पिण्याचे पाणी आणि विजेच्या तुटवड्याचा समाना करावा लागतो आहे. दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिली. 

चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या पुरी, खुर्दा या भागातील अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत येणाऱ्या नागरिकांना 50 किलो तांदूळ, दोन हजार रुपये रोख आणि पॉलिथीन पुरविण्यात येणार आहे. चक्रीवादळाचा कमी फटका बसलेल्या भागातील नागरिकांना 50 किलो तांदूळ, एक हजार रुपये रोख आणि पॉलिथीन पुरविण्यात येईल. घरांचे नुकसान झालेल्यांनाही आर्थिक मदत करण्यात येईल, असे पटनाईक यांनी स्पष्ट केले. पुरी शहरातील 70 टक्के आणि भुवनेश्वरमधील 30 टक्के भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, असे पटनाईक यांनी स्पष्ट केले. 

प्रशासनाकडून पुढील पंधरा दिवस शिजविलेल्या अन्नाचा पुरवठा केला जाईल. तसेच, राज्यात ठिकठिकाणी वृक्षारोपन करण्यावर भर देण्यात येईल, असे पटनाईक यांनी सांगितले. एकट्या पुरी शहरात 21 जणांचे बळी गेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

बांगलादेशात एक हजार घरे भुईसपाट 
'फणी' चक्रीवादळाने बांगलादेशातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. पाच जणांचा मृत्यू झाला असून, 63 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. बांगलादेशात पोचण्यापूर्वीच चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली, तरी मोठे नुकसान झाले आहे. एक हजारहून अधिक घरे भुईसपाट झाली आहेत. दहा लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT