नवी दिल्ली : एक देश, एक निवडणूक या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समितीच्या सात सदस्यांची आज घोषणा केली. यात माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी, घटनातज्ज्ञ सुभाष कश्यप व ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती होणार असल्याची घोषणा केली होती. या समितीच्या इतर सदस्यांची नावे मात्र जाहीर केली नव्हती. केंद्रीय कायदा व न्याय मंत्रालयाने या समितीतील इतर सात सदस्यांची नावे जाहीर केली. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांचा समावेश आहे.
याशिवाय माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनाही या समितीत स्थान मिळाले आहे. तसेच या समितीमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्यासोबत लोकसभेचे महासचिव राहिलेले डॉ. सुभाष कश्यप यांचाही समावेश आहे. माजी सनदी अधिकारी व आता भाजपचे राज्यसभेत सदस्य असलेले एन. के. सिंह यांचा या समितीत समावेश केला आहे.
केंद्रीय दक्षता आयोगाचे माजी आयुक्त संजय कोठारी यांनाही या समितीत स्थान मिळाले आहे. या समितीचे सदस्य सचिव म्हणून केंद्रीय कायदा व न्याय मंत्रालयाचे सचिव नितेशचंद्र राहणार आहे. या शिवाय या समितीच्या बैठकीला केंद्रीय कायदा व न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल उपस्थित राहतील, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.