
मुंबईत ३० वर्षे राहूनही मला मराठी येत नाही, काय करायचं बोल अशा एकेरी भाषेत उद्दामपणे विधान करणाऱ्या उद्योजक सुशील केडिया यांनी अखेर माफी मागितलीय. माझी चूक झाली आणि मी ती सुधारण्याचा प्रयत्न करेन. मराठी बोलण्याचा प्रयत्न करेन असं त्यांनी एका व्हिडीओतून स्पष्ट केलंय. मी जे काही बोललो ते चुकीच्या मानसिकतेतून आणि तणावातून बोललो होतो. माझ्या त्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून काहींनी वाद निर्माण केला असंही सुशील केडिया म्हणाले.