Corona Patient
Corona Patient Sakal
देश

देशात सोमवारी दिवसभरात फक्त ९१३ नवे कोरोना रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

देशात गेल्या २४ तासांत फक्त ९१३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर सोमवारी (ता.४) पहिल्यांदाच देशातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या ही एक हजारांच्या आत आली.

पुणे - देशात (India) गेल्या २४ तासांत फक्त ९१३ नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर सोमवारी (ता. ४) पहिल्यांदाच देशातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या ही एक हजारांच्या आत आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सद्यःस्थितीत भारतात एकूण १२ हजार ५९७ इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

सध्या देशात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये केरळ अव्वलस्थानी असून, देशात एकेकाळी सातत्याने अव्वल स्थानावर असणारे महाराष्ट्र राज्य हे आता पाचव्या स्थानावर गेले आहे. सध्या केरळमध्ये सर्वाधिक तीन हजार ५१७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही ९२१ इतकी आहे. देशात दुसऱ्या स्थानावर कर्नाटक, तिसऱ्या स्थानावर आसाम, चौथ्या क्रमांकावर मिझोराम राज्य आहे.

केरळपाठोपाठ कर्नाटकमध्ये १ हजार ५६७, आसाममध्ये १ हजार ३४८, मिझोराममध्ये ९७८ आणि महाराष्ट्रात ९२१ सक्रिय कोरोना रुग्ण शिलल्क राहिले आहेत. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण फक्त ०.०३ टक्के इतके असून, याउलट कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे ९८.७६ टक्के इतके आहे. देशभरात गेल्या २४ तासांत १ हजार ३१६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४ कोटी २४ लाख ९५ हजार ८९ झाली आहे. भारतातील दैनंदिन कोरोना बाधितांचा दर केवळ ०.२९ टक्के तर, आठवड्याचा कोरोनाबाधित दर हा ०.२२ टक्के इतका अल्प आहे.

महाराष्ट्रातील कोरोना सद्यःस्थिती

  • राज्यातील आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित --- ७८ लाख ७४ हजार ३९४

  • कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या --- ७७ लाख २५ हजार ६८४

  • एकूण कोरोना मृत्यू --- १ लाख ४७ हजार ७८९

  • राज्यातील सध्याचे एकूण सक्रिय कोरोना रुग्ण --- ९२१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT