Super Blood Moon
Super Blood Moon Sakal
देश

‘सुपर ब्लड मून’ पाहण्याची संधी

पीटीआय

कोलकाता - खगोलप्रेमींसह (Astronomer) चांद्रप्रेमींसाठीही एक आनंदाची बातमी (Good News) आहे. पुढील आठवड्यात २६ तारखेला खग्रास चंद्रग्रहणानंतर (Lunar Eclipse) पूर्वेकडी आकाशात ‘सुपर ब्लड मून’ (Super Blood Moon) पाहता येईल. त्या दिवशी रात्री चंद्र नेहमीपेक्षा ३० टक्के अधिक मोठा आणि १४ टक्के अधिक तेजस्वी दिसेल, अशी माहिती प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ देवीप्रसाद दुसारी (Deviprasad Dusari) यांनी दिली. (Opportunity to Watch Super Blood Moon)

ते म्हणाले, की येत्या २६ मे रोजी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अशा रेषेत येत आहेत, की पृथ्वीवरून चंद्र पूर्ण स्वरूपात दिसेल, त्याचवेळी काहीकाळ चंद्राला ग्रहणही लागेल. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना काही क्षणांसाठी पृथ्वीच्या सावलीतून जाईल. त्यामुळे, खग्रास चंद्रग्रहण अनुभवता येईल. हे चंद्रग्रहण प्रामुख्याने पूर्व आशिया, पॅसिफिक महासागर, उत्तर व दक्षिण अमेरिकेतील बहुतेक भाग आणि ऑस्ट्रेलियातून पाहता येणार आहे. चंद्रग्रहणाची खंडग्रास अवस्था दुपारी सव्वातीनला सुरू होऊन संध्याकाळी सहा वाजून २२ मिनिटांनी संपेल. भारतात बहुतेक ठिकाणांहून खग्रास अवस्थेत चंद्र पूर्व क्षितीजाच्या खाली असणार आहे.

पृथ्वीपासून चंद्र साडेतीन लाख कि.मी.वर

२६ मे ला चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येणार आहे. संध्याकाळी सात वाजून २३ मिनिटांनी तो पृथ्वीपासून तीन लाख ५७ हजार ३०९ कि.मी.वर असेल. खग्रास चंद्रग्रहणानंतर चंद्र पृथ्वीपासून सर्वांत जवळ येईल. खग्रास चंद्रग्रहणामुळे चंद्र काळसर लाल रंगाचा दिसतो. त्यामुळे, चंद्राची ही अवस्था ‘सुपर ब्लड मून’ म्हणून ओळखली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT