Parents robbery UP Yogi Adityanath criticism increase school fees Manish Sisodia
Parents robbery UP Yogi Adityanath criticism increase school fees Manish Sisodia sakal
देश

यूपीत पालकांची लूट : मनिष सिसोदिया

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री तसेच आम आदमी पक्षाच्या सरकारमधील शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांनी शालेय शुल्कवाढीवरून उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर टीका केली. योगी आदित्यनाथ सरकारने नुकतीच खासगी शाळांना शुल्कात वाढ करू देत पालकांची लूट केल्याचे ते म्हणाले.त्यांनी सांगितले की, पंजाबमध्ये १६ मार्च रोजी आपचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर दहा दिवसांत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी खासगी शाळांना शुल्कात वाढ करता येणार नाही असा आदेश जारी केला. दुसरीकडे उत्तर प्रदेशात २५ मार्च रोजी भाजपने सरकार स्थापन केले. शाळांना शुल्क वाढविण्यास आणि पालकांना लुटण्यास त्यांनी रान मोकळे सोडले आहे.

सिसोदिया यांनी दिल्लीचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, आम्ही याबाबत खासगी शाळांवर नियंत्रण ठेवले आहे. आधी या शाळा एकतर्फी वाढ करायच्या, पण २०१५ मध्ये आम्ही हे रोखले. गेल्या सात वर्षांत शुल्कवाढीसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. शुल्क वाढविणे खरोखरच गरजेचे आहे का हे ठरविण्यासाठी शाळांच्या बँक खात्याचे परिक्षण केले जाते.

सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी भाजप काम करू शकत नाही. मग सामान्य माणसाने कुठे जायचे? कोरोनामुळे लोकांचा रोजगार गेला तुम्ही सरकारी शाळा सुधारणार नाही आणि खासगी शाळांना शुल्क वाढवू देणार...तुम्हाला देश निरक्षर ठेवायचा आहे. भाजपचे प्रशासनाचे हेच मॉडेल आहे. कृपा करून पालकांचा विचार करा.

- मनीष सिसोदिया, दिल्लीचे उपमुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT