Parliamentary workshop for newly elected MLA in Delhi lok sabha rajya sabha
Parliamentary workshop for newly elected MLA in Delhi lok sabha rajya sabha Sakal
देश

नवनिर्वाचित आमदारांसाठी दिल्लीत संसदीय कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - संसदीय कामकाज, संसदीय समित्या, प्रश्नोतराचा तास व इतर संसदीय कामकाजाचे महत्व आदी विविध विषयांवर महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांना येत्या ५ व ६ एप्रिल रोजी दिल्लीत होणाऱया विशेष कार्यशाळेत लोकसभा व राज्यसभेच्या वरिष्ठ पदाधिकाऱयांसह, केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ खासदारांचे मार्गदर्शन मिळणार आहे. संसदीय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या(प्राईड) पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह आदींचे मार्गदर्शन नवीन आमदारांना मिळेल.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या वि स पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांनी सांगितले की संसदेच्या ग्रंथालय इमारतीतील प्राईडच्या सभागृहात ही कार्यशाळा होईल. ५ एप्रिलला सकाळी साडेनऊला बिर्ला व हरिवंश यांच्या मुख्य उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन होईल. दोन्ही संसदीय सभागृहांचे महासचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित रहातील. यासाठी विधानपरिषदेचे सबापती रामारजे नाईक निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ, संसदीय मंत्री अनिल परब, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित रहाणार आहेत.

नवीन आमदारंना संसदीय कामकाज पध्दतीची, संसद सभागृहात आपले वर्तन कसे असावे, लोकहिताचे प्रश्न व मुद्दे मांडताना नेमकी कोणती पथ्ये पाळावीत, संसदीय सचिवालयांचे कामकाज, एकाद्या मुद्यावर बोलण्यासाठी खासदारांनी नोटीस म्हणजे सूचना देण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते, संसदीय कार्यप्रणालीचा आत्मा मानल्या जाणाऱया संसदेच्या स्थायी व प्रवर समित्यांचे कामकाज कसे चालते आदी विविध मुद्यांबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येईल. दोन्ही सबागृहांचे कामकाज पाहण्याची संधीही राज्याच्या नवीन आमदारंना यानिमित्ताने मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT