Patna Bihar angry crowd sets a school on fire  esakal
देश

शाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संतप्त जमावाने पेटवली शाळा

Bihar News : बिहारमधील पाटणा येथे एका 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संतप्त लोकांनी शाळा आणि रस्ते पेटवून निदर्शने केली. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Sandip Kapde

पटनाच्या टीनी टोट शाळेजवळच्या नाल्यात 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला. यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर पालकांचा जमाव शाळा आणि पोलिस स्टेशनमध्ये जमला आहे. शाळेतील जवळपास 10 मिनीटांच सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे संतप्त जमावाने तोडफोड करत शाळेला आग लावली.

या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाने आग विझवली असून मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

नेमकं काय घडलं?

टिनी टॉट नावाच्या एका खाजगी शाळेत एका 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. गुरुवारी सकाळी मुलगा शाळेत गेला होता, असे सांगण्यात येत आहे. मात्र मुलगा सुट्टीनंतर शाळेतून परतला नाही. यानंतर कुटुंबीयांनी मुलाचा शोध सुरू केला. मुलाच्या शोधात कुटुंबीय शाळेत गेले.

तरीही कुटुंबीय राजी न झाल्याने मुलाचा शोध घेण्यासाठी शाळेत शोधाशोध सुरू केली. मुलाच्या शोधात कुटुंबीयांनी शाळेच्या आवारातील एका खोलीचे गटार उघडले आणि सगळेच अवाक् झाले. गटारात एका मुलाचा मृतदेह पडलेला होता. यानंतर शाळेत एकच गोंधळ उडाला.

कुटुंबीयांनी शाळेत चांगलाच गोंधळ घातला. यानंतर घटनेची माहिती तात्काळ दिघा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याठिकाणी संतप्त स्थानिक नागरिक आणि कुटुंबीयांनी चांगलाच गोंधळ घातला. रास्ता रोको करून जाळपोळ करण्यात आली. तसेच शाळेचा काही भाग स्थानिक लोक आणि कुटुंबीयांनी पेटवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT