Sukesh chandrashekhar met four female actresses while he was lodged in delhi tihar- ED charge sheet Esakal
देश

सुकेश अन् अभिनेत्रींची भेट घालून देणारी पिंकी अटकेत; मोबदल्यात सुकेशकडून घ्यायची तगडी रक्कम..

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - सुकेश चंद्रशेखर यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी पिंकी इराणी हिला आज दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात हजर केले. न्यायालयाने पिंकी इराणी हिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. (pinky irani arrested in sukesh chandrasekhar money laundering case )

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकी इराणीनेच जॅकलिन फर्नांडिस आणि इतर अभिनेत्रींची सुकेश चंद्रशेखरसोबत ओळख करून दिली होती. त्याबदल्यात तिला सुकेशकडून मोठी रक्कम मिळत होती. पिंकी, सुकेशसाठी मॉडेल्स आणि अभिनेत्रींशी संपर्क साधत असे आणि त्यांना सुकेशला भेटायला किंवा फोनवर बोलण्यास सांगत असे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखर यांच्या वतीने पिंकी अभिनेत्रींना भेटवस्तूही देत असे. सुकेशच्या पैशातून ती अभिनेत्रींसाठी महागड्या भेटवस्तूही विकत घेत असे.

या प्रकरणात आतापर्यंत जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्या अनेकदा ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तसेच तिला न्यायालयातही उपस्थित राहावं लागलं आहे.

हेही भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update:'मुळशीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस'; धरण ९९ टक्‍के भरले, आत्तापर्यंत एकुण ७४२८ मिमी पाऊस

Pune Rain Update:'भोर तालुक्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस'; वरंधा घाटातील महाड हद्दीत दरड कोसळली, वाहतूक बंद

Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' 10 खास गोष्टी, घरात पसरेल आनंदाची लाट

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT