Narendra Modi
Narendra Modi 
देश

काशीने ताकद आणि प्रेम दिले : मोदी

वृत्तसंस्था

वाराणसी : आज उत्तर प्रदेश देशाच्या राजकारणाला दिशा देत आहे. उत्तर प्रदेश देशाच्या राजकारणाची दिशा ठरविते. 2014, 2017 आणि आता 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील जनतेने आम्हालाच निवडले आहे. निकालाचे आकडे मांडणाऱ्यांना यंदा मतदारांनी पराभूत केले आहे. काशीने मला ताकद आणि प्रेम दिले असून, मला विजयाचा विश्वास होता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (सोमवार) वाराणसीत जाऊन काशी विश्वेश्वरची पूजा करून, मताधिक्य दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी प्रमुख नेते उपस्थित होते. 

मोदी म्हणाले, की काशीने दाखविलेल्या विश्वरूपाला पूर्ण भारताला प्रभावित केले होते. कार्यकर्त्यांचे समाधान हेच आमचा जीवनमंत्र आहे. पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या आदेशाचे पालन करतो. देशाचा पंतप्रधान असलो तरी एक कार्यकर्ता आहे. निवडणूक एखादा उमेदवार निश्चिंत असतो, ते फक्त काशीतील नागरिकांमुळे. काशीतील नागरिकांच्या विश्वासामुळे केदारनाथबाबाच्या सान्निध्यात जाऊन बसलो. काशीतील विजयाबद्दल मी निश्चिंत होतो. ही निवडणूक प्रत्येक घरातील नरेंद्र मोदीने लढली. प्रत्येकाला स्वतःतील शक्ती मोदींच्यात एकवटलेली दिसली आणि प्रत्येक जण नरेंद्र मोदी बनला. कार्यकर्त्यांचे समाधान करणे हाच माझा जीवनमंत्र आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने एवढ्या प्रचंड उकाड्यात उत्साहाने घराबाहेर पडत मतदान केले. त्यामुळे मतदारांचे आभार मानतो. काशीतील मुलींनी दुचाकीवरून रॅली काढत प्रचार केला. आसाम, केरळ, पश्चिम बंगालमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना हिंसेला सामोरे जावे लागले. तरीही आमचा विश्वास सबका साथ, सबका विकास याच्यावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT