PM Narendra Modi
PM Narendra Modi esakal
देश

भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, 8 वर्षात आम्ही 10 वरून 5 वर घेतली झेप : नरेंद्र मोदी

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान मोदींनी आज 75 हजार तरुणांना रोजगाराची नियुक्तीपत्रं दिली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज 'रोजगार मेळा' (Rozgar Mela) अंतर्गत 10 लाख कर्मचाऱ्यांसाठी भरती मोहिमेचा शुभारंभ केला. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याचा शुभारंभ केला.

यावेळी पंतप्रधान मोदींनी 75 हजार लोकांना नियुक्तीपत्रंही दिली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हरियाणातील गुरुग्राममध्ये होत असलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याशिवाय, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशातील PMAY-G च्या 4.5 लाखाहून अधिक लाभार्थ्यांच्या कार्यक्रमात सहभागी होतील. या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशात 35,000 कोटींहून अधिक खर्च करून सुमारे 29 लाख घरं बांधण्यात आली आहेत.

नरेंद्र मोदी म्हणाले, भारतातील युवा शक्तीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. गेल्या 8 वर्षात देशात रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोहीम सुरू आहे. आज त्याला आणखी एक दुवा जोडला गेला आहे. आज केंद्र सरकार 75000 तरुणांना नियुक्ती पत्र देत आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण स्वावलंबी भारताच्या मार्गावर चालत आहोत. यामध्ये आमचे नवोदित उद्योजक, शेतकरी, सेवा आणि उत्पादन सहयोगी यांचा मोठा वाटा आहे.

PM Narendra Modi

रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमादरम्यान पीएम मोदी म्हणाले, येत्या काही महिन्यांत लाखो तरुणांना भारत सरकार वेळोवेळी नियुक्ती पत्रं प्रदान करेल. आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 7-8 वर्षात आम्ही 10 वरून 5 वर झेप घेतली आहे. आज आमचा सर्वाधिक भर तरुणांच्या कौशल्य विकासावर आहे. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत देशातील उद्योगांच्या गरजेनुसार तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी मोठी मोहीम सुरू आहे, असं त्यांनी नमूद केलं. स्टार्टअप इंडिया मोहिमेनं देशातील तरुणांची क्षमता संपूर्ण जगात प्रस्थापित केली. 2014 पर्यंत देशात मोजकेच स्टार्टअप होते, आज ही संख्या 80 हजारांच्या पुढं गेली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT