Police security and alert in Belgaon
Police security and alert in Belgaon  
देश

बेळगावात अलर्ट जारी, पोलिस यंत्रणा सतर्क

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोल्हापूरात शुक्रवारी (ता. 18) झालेल्या भीषण स्फोटानंतर बेळगावात अलर्ट जरी करण्यात आला असून पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून रेल्वे आणि बस स्थानक आवारात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी सकाळीशी बोलताना दिली. 

कोल्हापूर येथील उजळीईवाडी येथील टोल नाक्यानजिक उड्डाणपुला रात्री पावणे आकाराच्या सुमारास ज्वलनशील वस्तूच्या स्फोटात दत्तात्रेय गणपती पाटील (56, रा. कोल्हापूर) हे ट्रक चालक ठार झाले. स्फोट इतका भीषण होता. की, परिसरातील घरे व आस्थापणाची तावदाणेही फुटली. एक विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही घटना घडल्याने तपास यंत्रणा देखील चक्रावली आहे. लागलीच बेळगावच्या पोलीस आयुक्तांनी कोल्हापूर पोलिसांना संपर्क साधून माहिती जाणून घेतली.

मात्र, स्फोटाबद्दल अद्याप माहिती नेमकी माहिती मिळालेली नाही. स्फोट घडवून आनण्यामागे दहशतवादी संघटनेचा हात आहे याचा तपास करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून बेळगावात पोलिस यंत्रणेने वर्दळीच्या ठिकाणी नजर ठेवून सावधानता बाळगली होती. त्यातच कोल्हापूरातील कालच्या स्फोटामुळे पोलिस आणखीनच सतर्क झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT