Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Arvinder Singh Lovely Joins BJP : दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंदर सिंह लवली हे चांगलेच चर्चेत आले होते
Former Delhi Congress chief Arvinder Singh Lovely joins BJP Lok Sabha Election 2024 politics News
Former Delhi Congress chief Arvinder Singh Lovely joins BJP Lok Sabha Election 2024 politics News

Arvinder Singh Lovely Joins BJP : दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंदर सिंह लवली हे चांगलेच चर्चेत आले होते. आगामी काळात ते काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले होते. या दरम्यान ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ते आज भारतीय जनता पक्षात सहभागी झाले आहेत. लवली सिंह यांच्यासोबत काँग्रेसचे नेते राजकुमार चौहान, अमित मलिक, नसीब सिंह आणि नीरज बसोया यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अरविंदर सिंह लवली यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंदर सिंह लवली यांनी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. त्यांनी प्रदेश प्रभारी दीपक बाबरिया आणि काँग्रेसचे उमेदवार उदित राज, कन्हैया कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

तसेच त्यांना भाजपमध्ये सहभागी होण्याबद्दल विचारले असता लवी यांनी, मी यापूर्वीही स्पष्ट केलं होतं आणि माझ्या राजीनामा पत्रात देखील स्पष्ट सांगितलं होतं की मला दुसरीकडे जायचं असेल तर एक वाक्याचा राजीनामा देण्यापासून कोण रोखत होतं, मी राजीनामा देण्याची कारणे यासाठी दिली की कदाचित ते दुरुस्त केले जातील. ज्या पद्धतीने लोकांना बाहेर काढलं जात आहे ते पाहून दुखः झालं नसतं तर पद का सोडलं असतं. मला कुठे पक्षातून बाहेर काढलं जात होतं.

Former Delhi Congress chief Arvinder Singh Lovely joins BJP Lok Sabha Election 2024 politics News
Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com