देश

"हत्ती' बिघडवणार राजकीय गणिते

सकाळन्यूजनेटवर्क

शिवपूर- मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-चंबळ विभागातील भाजप-कॉंग्रेसची गणिते बहुजन समाज पक्षामुळे (बसप) चुकण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या दोन्ही पक्षांची उमेदवार यादी अद्याप जाहीर झाली नसली, तरी कॉंग्रेस आणि भाजपतील नाराजांना उमेदवारी देण्याचा सपाटा बसपने लावला आहे.

बसपच्या या कृतीमुळे ग्वाल्हेर-चंबळ विभागात कॉंग्रेस आणि भाजपची राजकीय गणिते चुकणार आहेत. या विभागात परंपरेने या दोनच पक्षांमध्ये लढत होते; पण बसपच्या "हत्ती'मुळे आता येथे तिरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत. विजयपूर मतदारसंघाचे उदाहरण त्यासाठी देता येईल. हा मतदारसंघ म्हणजे कॉंग्रेसचे रामनिवास रावत यांचा गड. येथे कॉंग्रेसची लढत कायम भाजपबरोबर असते. बसपच्या उमेदवाराची रक्कम येथे अनेकदा जप्त झाली आहे. पण, यंदा विजयपूरमधून भाजपचे बंडखोर बाबूलाल मेवरा यांनी बसपच्या तंबूत प्रवेश केल्यामुळे चुरस वाढली आहे. मेवरा यांनी दोनदा आमदारकी जिंकली असून, राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे कॉंग्रेस आणि भाजपच्या मतांवर परिणाम होणार आहे. हे केवळ एक उदाहरण झाले. ग्वाल्हेर-चंबळ विभागातील अनेक मतदारसंघांत अशीच स्थिती असल्यामुळे बसपचा सुस्त पडलेला "हत्ती' वेगाने धावायला लागल्याचे दिसू लागले आहे.

शिवपूरमध्ये बसपने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तुलसीनारायण मिणा यांना उमेदवारी दिली असून, या मतदारसंघात मिणा समाजाची मते सर्वाधिक असल्यामुळे येथे तिरंगी लढत होईल. ग्वाल्हेर ग्रामीण मतदारसंघातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते साहबसिंह गुर्जर यांनी बसपमध्ये प्रवेश केला असून, या समाजाच्या प्रभावी मतांमुळे त्यांच्या बंडखोरीचा फटका भाजपपेक्षा कॉंग्रेसला जास्त बसणार आहे. शिवपुरीतून भाजपने उमेदवारी नाकारल्यावर कैलाश कुशवाह यांनी बसपकडून उमेदवारी मिळवल्यामुळे भाजपपुढेच आव्हान निर्माण झाले आहे.

भरवसा नाराजांवरच 
ग्वाल्हेर-चंबळ विभागात विधानसभेच्या 34 जागा असून, त्यातील दहा वगळता अन्य जागांवरील उमेदवार बसपने जाहीर केले आहेत. उमेदवार जाहीर न केलेल्या मतदारसंघांत ग्वाल्हेर, ग्वाल्हेर पूर्व आणि ग्वाल्हेर दक्षिण या महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. कॉंग्रेस आणि भाजपातील नाराजांना जवळ करून त्यांना या दहा मतदारसंघांमध्ये उमेदवारी देण्याची बसपची योजना असल्याचे कळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

SCROLL FOR NEXT