Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

ICC for 2025 Champions Trophy Pakistan : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात मोठी घोषणा केली आहे.
ICC for 2025 Champions Trophy Pakistan News Marathi
ICC for 2025 Champions Trophy Pakistan News Marathisakal

Pakistan propose three venues to ICC for 2025 Champions Trophy : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात मोठी घोषणा केली आहे. पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तीन ठिकाणांची निवड केली आहे. पीसीबीने ही तिन्ही ठिकाणे यादी आयसीसीकडे पाठवली आहे.

लाहोर, कराची आणि रावळपिंडी ही तीन ठिकाणे आहेत. वृत्तानुसार, भारताचे सामनेही येथे ठरले आहेत. आता पाकिस्तानच्या या घोषणेनंतर बीसीसीआयकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहायचे आहे.

ICC for 2025 Champions Trophy Pakistan News Marathi
IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

खंर तर यावेळी पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवत आहे. पण भारतीय संघ तिथे खेळायला जाणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आशिया कपचे यजमानपदही पाकिस्तानलाच दिले होते, पण त्यानंतर भारतीय संघाने तेथे खेळण्यास नकार दिला. आणि त्यानंतर पाकिस्तानला भारताचे सामने श्रीलंकेत आयोजित करावे लागले.

ICC for 2025 Champions Trophy Pakistan News Marathi
प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी लाहोरमध्ये पत्रकार परिषदेत चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक आणि ठिकाणांबाबत मोठा खुलासा केला. ते म्हणाले, आम्ही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक आयसीसीकडे पाठवले आहे. आयसीसीची टीम इथे आली आणि आमची बैठक खूप चांगली झाली. त्यांनी येथील व्यवस्थेचा आढावा घेतला आणि स्टेडियमच्या बाबतची माहितीही त्यांच्याशी शेअर केली. आम्ही आयसीसीच्या सतत संपर्कात आहोत. पाकिस्तानमध्ये एक उत्तम स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ICC for 2025 Champions Trophy Pakistan News Marathi
CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

भारतीय संघाने पाकिस्तानत 2008 मध्ये शेवटचा आशिया कप खेळला होता. तेव्हापासून पाकिस्तानच्या संघाने आयसीसी स्पर्धांसाठी तीन वेळा भारताचा दौरा केला आहे. मात्र, आता प्रथमच आयसीसीचा मोठा कार्यक्रम पाकिस्तानमध्ये आयोजित केला जाणार असून, यावेळी बीसीसीआयची भूमिका काय असते हे पाहायचे आहे. सरकारची परवानगी मिळाल्यानंतरच भारतीय संघ पाकिस्तानला खेळण्यासाठी जाईल.

काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की, पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांना चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात येण्याचे आश्वासन भारताकडून हवे आहे. मात्र, बीसीसीआयकडून अद्याप असे कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com