political leader and others over success of Chandrayaan-3 lander Vikram land safely on moon Sakal
देश

Chandrayaan-3 : विक्रम साराभाई हे नव्या भारताचे प्रतीक

चांद्रयान-३ मधील लँडरचे नाव ‘विक्रम’ असे आहे. भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : चांद्रयान-३ मधील लँडरचे नाव ‘विक्रम’ असे आहे. भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे. या विक्रम लँडरचे यशस्वी लँडिंग झाले असल्याने विक्रम साराभाई यांचीही शास्त्रज्ञांना आठवण होत आहे. विक्रम साराभाई यांचे पुत्र कार्तिकेय साराभाई यांच्याशी या निमित्ताने संवाद साधला असता त्यांनी, ‘चांद्रयान-३’ ही मोहीम ‘नव्या भारता’चे प्रतीक आहे, असे सांगितले.

पर्यावरणवादी असलेले कार्तिकेय साराभाई म्हणाले,‘‘आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा आहे. तसेच, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच यान उतरले असल्याने संपूर्ण जगासाठीही ही आनंदाची बाब आहे.

आधीही इतरांनी प्रयत्न केले होते, मात्र ते अपयशी ठरले होते. चंद्राच्या या भागात पाण्याचे अस्तित्व आढळण्याची शक्यता आहे.’’ लँडरला वडिलांचे नाव दिल्यामुळे अत्यंत अभिमान वाटत आहे. मात्र, ही केवळ आमच्या कुटुंबासाठी नाही, तर सर्वांसाठीच आनंदाची बाब असल्याचे साराभाई म्हणाले.

या लँडरचे विविध सुटे भाग विविध तज्ज्ञांनी बनविले आहेत. त्यामुळे हा लँडर म्हणजे संपूर्ण भारताचे स्वरुप आहे. या मोहिमेत भारतभरातील शास्त्रज्ञांचा सहभाग आहे, त्यामुळे हा नवा भारत आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

इतरांचे केवळ अनुकरण करण्यापेक्षा प्रत्येकाकडून काही तरी शिकण्यावर माझ्या वडिलांचा भर होता. चंद्रयान-२ हे भारताचे अपयश नाही, कारण त्याचा सध्याच्या मोहिमेला फायदाच होत आहे. आपण चुका सुधारल्या आहेत, त्यामुळे ती मोहीम हेदेखील यशच होते.

- कार्तिकेय साराभाई,पर्यावरणवादी

ही मोहीम संपूर्ण मानवतेसाठी महत्त्वाची आहे. विज्ञानाचा वापर इतर देशांशी स्पर्धा करण्यासाठी नाही, तर सर्वांच्या कल्याणासाठी केला जावा, असे माझ्या वडिलांचे मत होते. ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी माझ्या वडिलांचे हे स्वप्न पूर्ण केले आहे.

- मल्लिका साराभाई,सामाजिक कार्यकर्त्या

चांद्रयान ३ मोहीम ही भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची मोहीम आहे. या मोहिमेच्या यशामुळे देशातील शास्त्रज्ञांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. भारतीयांसह सर्व जगाला या यशाचा अभिमान वाटत आहे.

- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे. या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. समस्त भारतीयांचे आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन!

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

अद्भुत! चांद्रयान-३च्या यशाबद्दल ‘इस्रो’ आणि सर्व भारतीयांचे अभिनंदन! नवीन तंत्रज्ञानाचे दर्शन घडवत भारताने चंद्रावर अलगदपणे यान उतरविले आहे. या प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या युरोपीय अवकाश संस्थेचेही पुन्हा एकदा कौतुक! आम्हाला देखील या प्रक्रियेतून खूप काही शिकायला मिळाले.

-जोसेफ ॲशबॅकर, युरोपीय अवकाश संस्थेचे महासंचालक

चांद्रयान-३ चंद्रावर यशस्वीपणे उतरविल्याबद्दल इस्रो आणि भारतीयांचे अभिनंदन! आगामी काळात भारत आणि अमेरिकेला अवकाश संशोधन क्षेत्रात परस्परांच्या सहकार्याने मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

- एरिक गार्सेटी, अमेरिकेचे भारतातील राजदूत

चांद्रयान-३ चंद्रावर उतरवून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी इतिहास रचला आहे. हा आयुष्यातील दुर्मिळ क्षण असून मी इस्रोचे आणि चांद्रयान-३ मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे या अद्वितीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करते आणि भविष्यातील मोहिमांसाठी शुभेच्छा देते.

-द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

चंद्रावर भारताने आपली विजय पताका फडकविली आहे. अनुपम! हा जागतिक विक्रम आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी इतिहास रचला, इस्रोबद्दल भारतीयांना अभिमान आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ उतरवून भारताने आज पुन्हा सिद्ध केले की, २१ वे शतक हे भारताचे आहे.

- जगदीप धनकड, उपराष्ट्रपती

जय हो! इस्रो! इतर जग चंद्राच्या कल्पनांमध्ये आणि स्वप्नांमध्ये रमलेले असताना आपण चंद्राचा अनुभव घेत आहोत. आपण चांद्रयान -३ प्रत्यक्ष चंद्रावर उतरविले आहे. चंद्राच्या अवकाशात डौलाने फडकणारा तिरंगा भारतीय आकांक्षा सत्यात उतरल्याचे व पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे ‘आकाशाचीही मर्यादा नाही’ याचे द्योतक आहे.

- जितेंद्रसिंह केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान

आजच्या पथदर्शी यशाबद्दल टीम इस्रोचे अभिनंदन! चांद्रयान-३ हे चंद्रावर अलगदपणे उतरविण्यात आलेले यश, हे भारतीय शास्त्रज्ञांच्या दशकांच्या परिश्रमाचे फळ आहे. १९६२ पासून भारतीय अवकाश संशोधन प्रकल्पाने नवनवीन मानके निर्माण करत तरुणांना प्रेरणा दिली आहे.

- राहुल गांधी, खासदार काँग्रेस

संकलन : सुरेंद्र पाटसकर, सम्राट कदम, मंजूषा कुलकर्णी, सारंग खानापूरकर, गोपाळ कुलकर्णी, अरविंद रेणापूरकर, मयूर जितकर, रोहित वाळिंबे, अजिंक्य गटणे डिझाईन : महेंद्र बेल्हेकर, अविनाश लांडकर ,सुलेखन : प्रभाकर भोसले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

अमृता खानविलकरला करायचंय 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या बायोपिकमध्ये काम; म्हणाली- तिचं पात्र साकारणं हेच...

Vidhan Bhavan lobby clash Video: मोठी बातमी! विधानभवनाच्या लॉबीत राडा; पडळकर अन् आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले

'मेल्यानंतर तरी मला न्याय द्या' अभिनेत्याच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीने व्हिडिओ शेअर करत केले गंभीर आरोप, जीवन मृत्यूंशी देतेय झुंज

SCROLL FOR NEXT