देश

पोस्टाची परीक्षाही देता येणार मराठीतून!

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : बॅंकांप्रमाणेच टपाल विभागातील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षाही आता हिंदी व इंग्रजीप्रमाणे सर्व, म्हणजे 22 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येतील, असे आश्वासन दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत दिले. या गोंधळामुळे आज राज्यसभेचा प्रश्नोत्तर तासात आणि शून्य तास होऊ शकला नाही. 

टपाल विभागाच्या आगामी महिन्यात होणाऱ्या परीक्षा हिंदी-इंग्रजीत घेण्यात येणार असून, त्या तमीळ व सर्व भारतीय भाषांमध्ये घ्याव्यात या मागणीसाठी अण्णा द्रमुक व द्रमुकने आज राज्यसभेचे कामकाज पूर्वार्धात रोखून धरले. प्रसाद यांनी तातडीने सभागृहात येऊन स्पष्टीकरण करावे, अशी त्यांची मागणी होती. मात्र, आपल्याला याबाबत सविस्तर माहिती घ्यावी लागेल, लगेच देता येणार नाही व उद्या सकाळी आपण राज्यसभेसमोर येऊ, असे प्रसाद यांच्याकडून सांगण्यात आले. या गोंधळामुळे आजच्या संपूर्ण दिवसाचे कामकाज पाण्यात जाण्याची चिन्हे दिसल्यावर त्यावर राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी प्रसाद यांना लवकरात लवकर सभागृहात येण्याची सूचना केली. 

प्रसाद यांनी सांगितले की, टपाल खात्याच्या परीक्षेबाबत सर्व माहिती घेतली. या प्रकरणाचा आढावा घेतला असता; केवळ हिंदी आणि इंग्रजीतून परीक्षा घेतल्याने राज्यांमधील स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, या म्हणण्यात तथ्य आहे. त्यामुळे टपाल विभागाच्या परीक्षा तमीळसह सर्व प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्या जाव्यात, असा आदेश आपण तातडीने दिला आहे. प्रसाद यांच्या या घोषणेनंतर अण्णा द्रमुक आणि कॉंग्रेसच्या सदस्यांनी त्यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT