prashant kishor
prashant kishor  
देश

प्रशांत किशोर, नितीश कुमार नवे राजकीय समीकरण

वृत्तसंस्था

पटना: राजकीय समीक्षक प्रशांत किशोर हे राजकारणात प्रवेश करणार आहेत. त्यांनी या नव्या इनिंगची सुरवात बिहार राज्यातून करण्याचा निर्णय घेतला आहे. आज प्रशांत किशोर बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (जदयू) अध्यक्ष नितिश कुमार यांच्या उपस्थित जदयू  या पक्षात प्रवेश करणार आहेत. प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच जनता दलाच्या कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 
 


प्रशांत किशोर यांनी याबाबत अधिकृत ट्विट करुन सूचना दिली आहे. बिहारमधून नव्या प्रवासाला सुरवात करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, अशा आशयाचे ट्विट प्रशांत किशोर यांनी केले आहे. येणाऱ्या 2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन जदयू पक्षाची राज्यकार्यकारिणी बैठक आहे. या बैठकीसाठी पक्षाचे सदस्य, नेते, आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकाच्या दृष्टीने जदयूची ही महत्वपूर्ण बैठक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासाठी तर, 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकांत राजद-जदयू-काँग्रेससाठी आणि 2017 मध्ये उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकांत काँग्रेससाठी प्रशांत किशोर यांनी राजकीय समीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. एकवेळेस निवडणुका जिंकण्याचा मंत्र म्हणजेच प्रशांत किशोर असे मानले जायचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT