mann ki baat
mann ki baat 
देश

PM मोदी आज करणार ‘मन की बात’; या विषयावर करु शकतात संबोधन

नामदेव कुंभार

Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी 11 वाजता देशातील जनतेशी रेडिओवरुन मन की बात कार्यक्रमाव्दारे संवाद साधतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. मन की बात या कार्यक्रमाचा हा 79 वा भाग असेल. आकाशवाणी आणि दुरदर्शनच्या सर्व नेटवर्कवर याचं प्रसारण होत आहे. याशिवाय मोबाइल अॅप, डीडी न्यूज आणि प्रधानमंत्री कार्यालय (PMO) आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवर प्रसरण होणार आहे.

आजच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रदान नरेंद्र मोदी, टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा, कोरोना लॉकडाउन आणि लसीकरण या विषयावर बोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या 78 व्या भागातही ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूचं कौतुक केलं होतं. कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधान मोदी सतत जनतेशी संवाद साधत आहेत. आज ते पुन्हा देशवासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलिम्पिक स्पर्धा, कोरोना लस, उद्योग, शेती आणि शेतकरी या विषयांवर बोलण्याची शक्यता आहे.

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम आकाशवाणीवरुन प्रसारित होत असतो. 'मन की बात' या २० मिनिटांच्या कार्यक्रमातून सरकारच्या महत्वाच्या कामांची माहिती दिली जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातील दखलपात्र छोट्या-मोठ्या घटनांचा आढावा यात घेतला जातो. जनतेकडून विषय विचारले जातात, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातात. 'मन की बात'च्या पहिल्या एपिसोडमध्ये (ऑक्टोबर २०१४) मोदींनी स्वच्छतेवर भाष्य केलं होतं. तर नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्यघटनेवर चर्चा केली होती. आजपर्यंत या कार्यक्रमासाठी ६१,००० कल्पना जनतेनं दिल्या आहेत. देशातील सर्व प्रकारची प्रसारमाध्यमं या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT