Salute-To-Brave
Salute-To-Brave 
देश

सूड घ्या! देशभरात उद्रेक; लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - ‘पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानात घुसून बदला घ्या, त्यांना धडा शिकवा,’ अशा संतप्त प्रतिक्रिया आज देशभरातून उमटल्या. ‘हा हल्ला विसरणार नाही, बदला घेऊ’, असा स्पष्ट इशारा ‘सीआरपीएफ’ने दिला, तर ‘दहशतवादी संघटना आणि त्यांच्या पाठीराख्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाईची दिशा स्पष्ट केली. पाकिस्तानला असलेला ‘सर्वाधिक प्राधान्य देशाचा’ दिलेला दर्जा भारताने तातडीने रद्द केला. दरम्यान, पोलिसांनी सात स्थानिक युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ४० जवानांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रियांचा उद्रेक झाला. काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पाकिस्तानचा जाहीर निषेध, दहशतवादाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. केंद्र सरकारनेही राजनैतिक आणि लष्करी पातळीवर अत्यंत गंभीर दखल घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली, तसेच त्यांनी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांशीही चर्चा केली. 

‘सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. सैनिकांच्या शौर्यावर पूर्ण विश्‍वास आहे,’ असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. सोबतच ‘दहशतवादी संघटना आणि त्यांच्या पाठीराख्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांना भयंकर मोठी किंमत चुकवावी लागेल,’ असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. सरकार आता ‘आर या पार’च्या मनःस्थितीत दिसत आहे. या प्रकरणी विचारविनिमय करण्यासाठी सरकारने उद्याच (ता. १६) दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पाकिस्तानविरुद्ध केल्या जाणाऱ्या संभाव्य कठोर कारवाईबाबत विरोधी पक्षीयांशी चर्चा करण्याच्या हेतूने ही बैठक बोलावल्याचे सत्तारूढ सूत्रांनी सांगितले. उद्याच्या बैठकीत प्रस्तावित कठोर कारवाईबाबत सूचक कल्पना मिळू शकते. पाकिस्तानबरोबरील सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्याबाबतही उद्याच्या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो. सर्व विरोधी पक्षांनीही ‘संकटाच्या काळी आपण सरकारच्या पाठीशी आहोत,’ असे स्पष्ट केले. 

सकाळच्या बैठकांनंतर पंतप्रधानांच्या हस्ते ‘वंदे भारत’ या नव्या वेगवान रेल्वेगाडीचे उद्‌घाटन झाले. त्याप्रसंगी बोलताना मोदींनी दहशतवादी संघटनांसोबतच पाकिस्तानवरही प्रहार केले. या हल्ल्यामागचे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा नक्की मिळेल, याची ग्वाही मी देशाला देतो, असे ते म्हणाले. 

‘भिकेचे डोहाळे लागलेल्या शेजारी देशाला वाटते आहे, की अशा हल्ल्यातून भारताला अस्थिर करता येईल. मात्र हे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत. या मार्गाने जे कोणी गेले ते बरबाद झाल्याचे काळाने सिद्ध केले आहे. या हल्ल्यास १३० कोटी हिंदुस्थानी सडेतोड उत्तर देतील,’ अशा शब्दांत मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता टोला लगावला. 

जागतिक पातळीवर पाकला कोणाचाही ‘आधार’ मिळत असला तरी त्या देशाच्या ताज्या कागाळीला भारताकडून अत्यंत कठोर व सडेतोड उत्तर मिळणार हे सरकारच्या पातळीवर निश्‍चित मानले जाते. पाकिस्तानबाबत प्रेम असलेल्या बड्या देशांकडून याबाबत अडथळे आणले जाणार, याचीही सरकारला कल्पना आहे. मात्र सरकारने आता ‘आर-पार’च्या अटल उक्तीच्या अंमलबाजवणीची मानसिकता केल्याचे सूत्रांनी नमूद केले.

बुलडाणा जिल्ह्यातील दोन सुपुत्र हुतात्मा 
पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत व लोणार तालुक्‍यातील गोवर्धन नगर तांड्यातील नितीन शिवाजी राठोड हे जवान हुतात्मा झाले. उद्या (ता. १६) या दोघांवर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी...

  • पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तांना पाचारण करत निषेध. 
  • हल्ल्याचा तपास करण्यासाठी लष्कराचे संपूर्ण चौकशीचे आदेश.
  • केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंहांकडून घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी, जखमी जवानांची विचारपूस.
  • जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने, वाहनांची जाळपोळ.
  • जम्मूमध्ये संचारबंदी लागू.
  • विरोधकांचे पूर्ण सहकार्य
  • आज (शनिवार) नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक
  • राजधानी दिल्लीसह देशात अनेक ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळून हल्ल्याचा निषेध
  • परराष्ट्र मंत्रालयाने बैठक बोलावित २१ देशांच्या राजदूतांना हल्ल्याची माहिती दिली.

पाकिस्तानचे पाठबळ असलेल्या जैशे महंमद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला आहे. त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशी मी देशवासीयांना खात्री देतो. 
- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री

अशा प्रकारचा हिंसाचार निंदनीय आहे. दहशतवाद आमच्या देशात फूट पाडू पाहत आहेत. पण कोणतीही शक्ती असे करू शकत नाही. सर्व विरोधक या परिस्थितीमध्ये लष्कर आणि सरकारच्या पाठीशी आहेत.
- राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष

जशास तसे उत्तर देण्याचे बोलत तोंडाच्या वाफा दवडू नका. पाकिस्तानात घुसून त्यांना धडा शिकविण्याची हीच वेळ आहे. निवडणुका, प्रचार राहू द्या बाजूला. देश सरकारच्या मागे उभा आहे.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

हा संपूर्ण भारतावरच झालेला हल्ला आहे. कटकारस्थानांचा वापर करून भारतामध्ये कधीही फूट पाडली जाऊ शकत नाही, हे दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना दाखवून दिले पाहिजे. 
- लालकृष्ण अडवानी, ज्येष्ठ भाजप नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT