Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Murder In Mahim: आशुतोष राणा (Ashutosh Rana) आणि विजय राज (Vijay Raaz) यांची मर्डर इन माहीम (Murder In Mahim) ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Murder In Mahim
Murder In Mahimesakal

Murder In Mahim: ओटीटीवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट रिलीज होतात. प्रेक्षकांना अनेकदा सस्पेन्स आणि थ्रिलर असणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपट आवडतात. अशातच एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित आशुतोष राणा (Ashutosh Rana) आणि विजय राज (Vijay Raaz) यांची मर्डर इन माहीम (Murder In Mahim) ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

'मर्डर इन माहीम'ची स्टार कास्ट

'मर्डर इन माहीम' या वेब सीरिजमध्ये विजय राज हे पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत तर आशुतोष राणा हा पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये काही मराठमोळे कलाकार देखील दिसत आहेत. या वेब सीरिजमध्ये शिवाजी साटम आणि भारत गणेशपुरे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

कधी रिलीज होणार वेब सीरिज?

Jio Cinema ने 'मर्डर इन माहीम' या वेब सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यांनी कॅप्शन दिलं, "खून, द्वेष आणि खोटेपणा, माहीमच्या रस्त्यांवर एक रहस्य आहे. तुम्ही सत्य उघड करण्यास तयार आहात का? 'मर्डर इन माहीम'10 मे पासून JioCinema वर स्ट्रीम होणार आहे. JioCinema प्रीमियमचं सब्सक्रिप्शन 29 प्रति महिना आहे."

पाहा ट्रेलर:

Murder In Mahim
Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

लेखक जेरी पिंटो यांच्या पुस्तकावर आधारित असणाऱ्या या सीरिजचं दिग्दर्शन राज आचार्य यांनी केले आहे. शिवानी रघुवंशी, शिवाजी साटम, स्मिता तांबे, दिव्या जगदाळे, राजेश खट्टर आणि बेनाफ्शा सूनावाला या कलाकारांनी देखील या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com