देश

Breaking: पुणे पोलिसांच्या पथकावर उत्तर प्रदेशमध्ये हल्ला

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ- पुणे पोलिसांच्या (pune police) पथकावर उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) गाझियाबादमध्ये (ghaziabad ) हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील एका हत्त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिस पथक गाझियाबादमध्ये गेलं होतं. यावेळी जमावाने पोलिसांना मारहाण केली, तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोपींवर कारवाईची मागणी होत आहे. एका संशयित महिलेच्या चौकशीसाठी पुणे पोलिस गाझियाबादमध्ये गेले होते. (pune police attacked by uttar pradesh ghaziabad mob)

काय आहे प्रकरण?

पुण्यात पाच दिवसांपूर्वी फरासखाना पोलिस स्टेशनमधील एका कॉन्स्टेबलची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आणि एका आरोपला अटक केली. याच दिवशी एक महिला उत्तर प्रदेशला फरार झाली होती. याच्या तपासासाठी सहा पोलिसांचं पथक इनोव्हा प्रायव्हेट कार घेऊन गाझियाबादमध्ये गेले होते. यावेळी महिलेसंबंधी माहिती काढण्याचा पोलिस प्रयत्न करत होते. पण, परिसरातील काही लोक तेथे जमले आणि त्यांनी पुणे पोलिसांवर हल्ला केला. त्यांना मारहाण करत गाडीची तोडफोड केली.

पोलिसांनी गाझियाबाद स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला, पोलिसांच्या मदतीने पुणे पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतलंय. महिलेला घेऊन पोलिस महाराष्ट्राकडे रवाना झाले आहेत. असे असले तरी आरोपींवर काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT