Pune researchers visit Dras area Chromium iron magnesium found Tiger Hill 
देश

‘टायगर हिल’च्या कुशीत खनिजांचे भांडार

पुण्यातील संशोधकांची द्रास परिसरात पाहणी; क्रोमियम, लोह आणि मॅग्नेशिअम आढळल्याचा दावा

संतोष शाळिग्राम

द्रास : जगातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड गाव असलेला द्रासचा परिसर हा खनिज संपत्तीने भरलेला आहे. कारगिल युद्धावेळी जगासमोर आलेल्या टायगर हिलला लागूनच एक ऑरेंज हिल असून, त्यात स्टेनलेस स्टील आणि रंग उद्योगाला लागणारे क्रोमाइट खनिज मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि पुण्यातील अन्य काही संशोधक या भागाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासमवेत डॉ. सुरेश गोसावी, डॉ. करमळकर, रेमंड दुरायस्वामी, शिवानी हर्षे, डॉ. मल्लिका जोन्नलगड्डा हे आहेत. त्यांनी कारगिल वॉर मेमोरियलजवळ असलेल्या टायगर हिल परिसराची पाहणी केली. त्यावेळी त्यांना लोह, मॅग्नेशिअम आणि क्रोमियम ही खनिजे असलेले दगड सापडले. त्यातही क्रोमाइट मोठ्या प्रमाणावर असल्याचे या संशोधकांनी सांगितले.

भूशास्त्राचे संशोधक असलेले डॉ. करमळकर याबाबत ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘‘क्रोमाइटचे प्रमाण या दगडांमध्ये ६०-७० टक्के आहे, तर अन्य दोन खनिजांचे प्रमाण तीस टक्के आहे. त्यामुळे त्यांना शुद्धरुप मानावे लागेल. क्रोमाइट हे उद्योगांसाठी महत्त्वाचे खनिज आहे. स्टेनलेस स्टील बनविण्यासाठी, गंज रोखण्यासाठी तसेच रंगनिर्मितीमध्ये त्याचा उपयोग केला जाते. कारगिलच्या युद्धभूमीतील ‘ऑरेंज हिल’ टेकडीवर या खनिजांचे भांडार आहे’’

‘‘ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये या खनिजांच्या खाणी आहेत. हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये या खनिजांचे अस्तित्व नोंदले गेले होते. पण गेली अनेकवर्षे त्यावर काम झालेले नाही. मात्र अशा प्रकारची खनिजे सापडली पाहिजेत. जेणेकरून उद्योग क्षेत्राला उपयोग होईल. आता केवळ संशोधन म्हणून आम्ही त्याकडे पाहतो आहोत. भविष्यात उद्योग क्षेत्र त्यांची किंमत ठरवू शकतील. आता कारगिलच्या द्रास भागात ही खनिजे सापडतात. पण युद्धस्मृतीचा परिसर असल्याने तेथून खनिजे काढता येणे अशक्य वाटते. परंतु कारगिल जिल्ह्याच्या अन्य काही भागांत ही खनिजे सापडतील, त्यावर आणखी संशोधन होण्याची गरज आहे,’’ असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

‘‘संशोधकांच्या पुण्यातील गटातील डॉ. रेमंड दुरायस्वामी हे लडाखमधील नुब्रा व्हॅलीमध्ये संशोधन करीत आहे़त. तिथे तांबे, शिसे आणि जस्त ही खनिजे सापडली आहेत. या खनिजांचे मोठे साठे तिथे असू शकतात, हे उद्योगांसाठी भविष्यात फायद्याचे ठरू शकेल,’’ असा विश्वास डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केला.

संशोधकांच्या दृष्टीने खनिजजन्य दगड सापडणे महत्त्वाची गोष्ट असते. कारण त्यातून कित्येक वर्षापूर्वी जमिनीखाली आणि वर झालेल्या घडामोडींचा आदमास लावणे सोयीचे ठरू शकते. हिमालयाच्या निर्मितीचा अंदाजही त्यातून बांधता येऊ शकतो.

- डॉ. नितीन करमळकर, (माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे‌ विद्यापीठ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

Flipkart-Axis Bank ची मोठी घोषणा! कार्ड पेमेंटसाठी आता OTP ची गरज नाही

SCROLL FOR NEXT