देश

नरेंद्र मोदी म्हणजे "प्राइम टाइम मिनिस्टर'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे "प्राइम टाइम मिनिस्टर' आहेत, अशा शब्दांत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज हल्लाबोल केला. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्याच्या नंतरही तब्बल तीन तास मोदी हे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात छायाचित्रणात व्यस्त होते, अशी टीका करत राहुल यांनी ट्विटद्वारे मोदींवर आज निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये राहुल यांनी "फोटोशूटसरकार' असा हॅशटॅगही वापरला आहे.

राहुल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाल्याची बातमी समजल्यानंतरही तब्बल तीन तास "प्राइम टाइम मिनिस्टर' हे फिल्म शुटिंगमध्ये मग्न होते.' 

याच मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर काल कॉंग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली होती. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाल्याचे बातमी समजल्यानंतरही सुमारे तीन तास मोदी हे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात चित्रिकरणात व्यस्त होते, असा आरोप कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी काल केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT