ajit_doval
ajit_doval 
देश

मसूद अजहरसोबत डोवल विमानात नव्हतेच - सुरक्षा यंत्रणा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मसूद अजहरला सोडण्यासाठी खुद्द अजित डोवल 1999मध्ये त्याच्यासोबत गेले होते असा आरोप सोमवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. जैशे महंम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला दहशतवाद्यांचा हवाली करण्यासाठी कंदहारला गेलेल्या विमानात अजित डोवल असल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु, अजित डोवाल या विमानात नव्हतेच असा खूलासा सुरक्षा यंत्रणेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

1999 मध्ये 162 भारतीय प्रवासी घेऊन जाणारे विमान जैशे महंम्मदच्या दहशतवाद्यांनी हायजॅक करून कंदहारला नेले होते. सुरुवातीला त्यांनी 20 कोटी डॉलर्स आणि जैशच्या 36 दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली होती. दहशतवाद्यांना सोडावे की सोडू नये यावरून संसदेत भरपूर वादही झाला होता. तेव्हा अजित डोवल भारताची गुप्तचर संस्था रॉचे ऍडिशनल डायरेक्टर होते. अजहरच्या सुटकेवर शिक्कामोर्तब होण्याआधी दहशतवाद्यांशी बोलणी करण्यासाठी डोवल यांना सरकारने पाठवले होते. 'डोवल यांनी तालिबानच्या आणि जैशेच्या दहशतवाद्यांशी चर्चा केली होती. 

दहशतवाद्यांची 20 कोटींची, 36 दहशतवादी सोडण्याची मागणी त्यांना मागे घेण्यास डोवल यांनी भाग पाडले होते. मसूद अजहरच्या सुटकेआधी ते परतले होते.' अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. 

मसूद अजहर आणि ओमार शेखला सोडा या मागणीवर दहशतवादी शेवटपर्यंत ठाम राहिले होते. या घटनेचे उल्लेख तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्या आत्मचरित्रातही आला असून, वरील घटनाक्रमच त्यामध्ये नमूद केला गेला आहे. त्याप्रमाणेच तत्कालीन रॉ प्रमुख ए .एस. दुलट यांच्या वाजपेयींच्या कालखंडातील काश्मीर (Kashmir: The Vajpeyee years) या पुस्तकातही आला आहे. त्यामुळे राहुल गांधींचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे. 

मसूद अजहरची सुटका करण्यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री जसवंत सिंह गेले होते. जसवंत सिंहांनीच मसूद अजहर आणि ओमार शेखला दहशतवाद्यांच्या हवाली करून भारतीय प्रवाशांची सुटका केली होती. विमान हायजॅकमध्ये सारे निर्णय सरकारने घेतले होते, अधिकारी फक्त आपले कर्तव्य पार पाडत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT