Arun Jaitly
Arun Jaitly 
देश

जीएसटीबाबत राहुल गांधीचे विचार मुर्खासारखे: जेटली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: वस्तू आणि सेवाकरावरुन (जीएसटी) भाजप आणि काँग्रेसमध्ये अजूनही शाब्दिक चकमकी सुरू असून, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीबाबत राहुल गांधी यांच्या कल्पना आणि विचार अगदी मुर्खासारखे आहेत, असे म्हटले आहे.

जेटलींनी ट्विट करून सांगितले की, ''2019 मध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर जीएसटीचा कमाल दर 18 टक्के करू असे आश्वासन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये असताना दिले. मात्र हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. कारण चप्पल आणि बीएमडब्ल्यूवर एक सारखाच कर लावता येणे शक्य आहे का?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यावर देखील जेटलींनी प्रतिक्रिया दिली. सध्या गुजरातमध्ये निवडणुकीच्या रणधुमळीत 18 टक्के जीएसटी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. आम्ही सत्तेत आल्यास जीएसटीचा दर 18 टक्के करू असे आश्वासन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी दिले आहेत. त्यावर मोदी म्हणाले होते की, ''राहुल गांधी यांचे जीएसटीबाबत विचार वेड्यासारखे आहेत.'' त्यावर चिदंबरम पलटवार करत म्हणाले की, ''मग अरविंद सुब्रमण्यम आणि इतर अर्थशास्त्रज्ञांचे जीएसटीबाबत विचार देखील मुर्खासारखे आहेत का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT